अंबाजोगाई, आष्टीत रुग्णसंख्येचे चढता क्रम
प्रारंभ । वृत्तसेवा
बीड : जिल्ह्यामध्ये गेल्या तीन दिवसांपासून रुग्णसंख्याही मोठ्या प्रमाणात वाढत असून आज सुद्धा जिल्ह्यात 711 नव्या रुग्णांची भर पडली. यात बीड तालुक्यात 189 नव्या रुग्णांची भर पडल्यामुळे बीड तालुक्यासह जिल्ह्यातील कोरोना आकडे वाढत असल्यामुळे जिल्हा प्रशासनासह बीडकरांची चिंता वाढताना दिसत आहे.
आज दुपारी आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या 5899 अहवालापैकी 5188 अहवाल निगेटिव्ह आले तर 711 अहवाल पॉझीटिव्ह आले. यात बीड-189, अंबाजोगाई-158, आष्टी-102, धारूर-11, गेवराई-54, केज-45, माजलगाव-56, परळी-44, पाटोदा-22, शिरूर-16, वडवणी-14 असे रुग्ण जिल्हाभरात आढळून आले. असेच आकडे वाढत गेले तर जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा अपुरी पडण्याची भीती निर्माण झाली असून आता नागरिकांनीच कोरोना हरवण्यासाठी स्वत:ची काळजी स्वत:च घेण्याच गरज आहे.