माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी साधला सामाजिक समतोल
गेवराई : प्रतिनिधी गेवराई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी जगन्नाथ काळे आणि उपसभापती सौ. लक्ष्मीबाई पवार यांची निवड करण्यात आली असून माजी आमदार अमरसिंह पंडित आणि विद्यमान आमदार विजयसिंह पंडित यांनी सामाजिक समतोल साधत धनगर समाजालाला न्याय दिला आहे. यावेळी धनगर समाजाच्या वतीने आ. विजयसिंह पंडित यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला माजी आमदार अमरसिंह पंडित, माजी सभापती मुजिब पठाण, कुमारराव ढाकणे, माजी उपसभापती विकास सानप, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, संभाजीराव पवळ यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
मराठवाड्यातील आग्रगण्य बाजार समिती म्हणून गेवराई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मुजिब पठाण आणि उपसभापती विकास सानप यांनी कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर आपल्या पदाचे राजीनामे दिल्यामुळे रिक्त झालेल्या सभापती व उपसभापती पदाची निवडणूक घेण्यात आली. यावेळी सर्व संचालक व निवडणूक निर्णय अधिकारी सहाय्यक निबंधक दिपक पवळ हे उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नवनिर्वाचित सभापती जगन्नाथ काळे आणि उपसभापती श्रीहरी पवार यांचा सत्कार करण्यात आला.
*सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय घेतला —अमरसिंह पंडित*
============
ग्रामीण भागाण चांगल्या प्रकारे काम करणाऱ्या आणि सर्व सामान्य तसेच विविध जाती धर्मातील कार्यकर्त्यांला पदावर सन्मान करण्याची आपली भुमिका आहे, आणि त्यात कसलाही किंतू परंतु नाही. सर्वांना विश्वासात घेऊन आपण ही निवड केली आहे.
गेवराई कृषी उत्पन्न बाजार समिती ही मानाची संस्था आहे. एक रुपयाचेही कर्ज आपल्या बाजार समितीवर नाही. शेतीसाठी खुप कामे करायचे आहे. बाजार समितीत कोल्ड स्टोरेज सुरु करायचे आहे. बाजार समितीत शेतीची वारंवार चर्चा होण्यासाठी एक नवे दालन सुरु करणार आहोत. राजकीय चर्चेशिवाय शेती मातीची आणि शेतकरी हिताची चर्चा व्हावी हीच आली भुमिका आहे. आपण जर प्रामाणिकणे काम केले तर विधानसभा निवडणुकीत मतदारांनी टाकलेल्या विश्वास आपण सार्थ करु. पाऊस आणि पुरग्रस्त परिस्थितीमुळे शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. आता भेदभाव करायचा नाही. अडचणीतल्या प्रत्येक व्यक्तीला आपल्याला मदत करायची आहे. सर्व शेतकऱ्यांची झालेली नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत असे सांगून कुणीही धिर सोडू नये असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
*सर्व समाजघटकांना न्याय देण्याचा प्रयत्न शिवछत्र परिवार करत आहे —आ. विजयसिंह पंडित*
============
याप्रसंगी बोलताना आ. विजयसिंह पंडित म्हणाले की, सर्व संस्थांमध्ये शिवछत्र परिवाराने सर्व समाजघटकांना न्याय देण्याचा कायम प्रयत्न केला आहे. गेवराई विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व आपल्याकडे आहे, आपली जबाबदारी वाढली आहे. बाजार समितीच्या माध्यमातून शेतकरी शेतमजूर यांना दिलासा आणि आधार देण्याचे काम करायचे आहे. जाती जाती जातीमध्ये तेढ निर्माण करुन शिवछत्र परिवाराला बदनाम करण्याचे काम कांहीं लोक करत आहेत, त्यांचा कुटील डाव हानून पाडावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले
*मी सभापती झालो, यावर विश्वास बसत नाही — जगन्नाथ काळे*
=============
याप्रसंगी बोलताना नवनिर्वाचित सभापती जगन्नाथ काळे म्हणाले की, आज मी सभापती झालो यावर विश्वास बसत नाही. आमचे नेते अमरसिंह पंडित यांनी टाकलेला विश्वास आपण सार्थ करु असेही ते म्हणाले.
*उपकार कधीही विसरणार नाही —उपसभापती श्रीहरी पवार*
============
माजी आमदार अमरसिंह पंडित आणि विद्यमान आमदार विजयसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली आपण प्रामाणिक आणि निष्ठेने काम करु. माझ्यासारख्या सामान्य माणसालाला शिवछत्र परिवाराने सर्वात मोठ्या पदावर बसवले. शिवछत्र परिवाराचे उपकार आण कधीच विसरणार नाही असेही ते यावेळी म्हणाले.
यावेळी माजी सभापती मुजिब पठाण यांनीही मनोगत व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधव चाटे यांनी केले. यावेळी बाजार समितीचे संचालक अशोक नाईकवाडे, पांडुरंग मुळे, रामलाल धस, हनुमान कोकणे, महारुद्र चाळक, बाबासाहेब जाधव, रमेश साखरे, अशोक खरात, रमेश खोपडे, मंगेश कांबळे, दिलीपकुमार जैन, राम चाळक, कृष्णा राऊत, सौ.वैशाली जाधव यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.