आ.संदीप क्षीरसागरांनी मानले बीड मतदारसंघाच्या वतीने आभार
बीड :- महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अजित दादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (दि.१९) रोजी झालेल्या नियोजन समितीच्या बैठकीत आ.संदीप क्षीरसागर यांनी बीड मतदारसंघाच्या विकासाच्या दृष्टीने महत्वाकांक्षी असलेले विविध विषय आणि विकासकामे ना.अजितदादा आणि समितीसमोर प्रस्तावित केली. त्यावर ना.अजितदादांनी प्रस्तावित केलेल्या विविध कामांना विकास निधी देण्यासाठी सकारात्मकता दर्शवत, निधी मंजूरीसाठी आदेशीत केले. तसेच बीड मतदारसंघातील अनेक महत्वाच्या कामांना मंजुरी दिली. त्याबद्दल आ.संदीप क्षीरसागर यांनी ना.अजितदादांचे बीड विधानसभा मतदारसंघाच्या वतीने आभार मानले आहेत.
खालील कामांना मिळाली मंजुरी
•बीडच्या विमानतळ उभारणी करता जिल्हाधिकारी कार्यालय, बीड यांनी जागेची तांत्रिक क्षमता तपासणी करता प्रस्ताव सादर केलेला आहे. लवकरच हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठीचा मार्ग मोकळा झाला आहे.
•बीड शहरात सेंटर फॉर इनोव्हेशन च्या उभारणीबाबत टाटा टेक्नॉलॉजी, पुणे यांनी संमती दर्शवली आहे. त्याबाबत पुढील कार्यवाही करण्यात यावी.
•शहरातील विद्यार्थी, विज्ञान व संशोधन प्रेमी तसेच नागरिकांसाठी सायन्स पार्क आणि तारांगण प्रस्तावास मान्यता देण्यात आली.
•जिल्हा रुग्णालय, बीड येथे शहरी व ग्रामीण भागातील रुग्णांसाठी महत्वाच्या सुविधा करिता भरीव निधीला मान्यता देण्यात आली.
•बिंदुसरा प्रकल्प तसेच बीड मतदार संघातून जाणार्या बिंदुसरा नदी पात्रात स्वच्छता व सुशोभीकरण कामे होणार आहेत.
•जिल्हा क्रीडा संकुल, बीड येथे सिंथेटिक ट्रॅक व विविध क्रीडा सुविधा निर्माण करण्याची मागणी केली.
•बीड जिल्हा ग्रंथालय इमारत बांधकाम करण्यासाठी रोल मॉडेल तयार करण्याचे सुचविले.
•बीड शहरातील खुले भूखंड व उद्यान विकसित करण्यात येणार आहेत. शहरातील महत्त्वाचे डीपी रस्ते निर्माण करण्यात येणार आहेत. शहरातील महत्त्वाच्या चौकांचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. घनकचरा व्यवस्थापन व पाणी व्यवस्थापन करण्यात येणार आहे.
•बीड मतदार संघातील पर्यटनाचे स्थळ असलेले युवा शांतीवन व सह्याद्री देवराई या ठिकाणी वन विभागामार्फत विविध विकासकामे करण्यात येणार आहेत.