“राष्ट्रीय सचिव असलेल्या पंकजाताई, अपक्ष उमेदवाराचे समर्थन करून तुम्ही मला धोका द्यायला नको होता ”
आ.सुरेश धस यांचा घणाघात
आष्टी (प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सचिव असलेल्या पंकजाताई मुंडे यांनी चुकीच्या माणसाचे ऐकून भीमराव धोंडे या अपक्ष उमेदवाराला विजयी करा असे फोन करून भाजपा उमेदवार असलेल्या सुरेश धस यांना पराभूत करा असा प्रचार करून मला धोका द्यायला नको होता असा घणाघात आष्टी विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे विजयी उमेदवार आ.सुरेश धस यांनी केला
आष्टी येथील विजयी सभेमध्ये ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर माजी आमदार साहेबराव दरेकर उद्धव दरेकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रमजान तांबोळी आष्टीचे माजी नगराध्यक्ष रंगनाथ धोंडे, विद्यमान नगराध्यक्ष जिया बेग, पाटोदा नगराध्यक्ष राजू जाधव, शिरूर नगराध्यक्ष रोहिदास गाडेकर,पाटोदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती किरण शिंदे पाटील, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा चे प्रदेश सचिव अभिजीत शेंडगे, ज्ञानेश्वर माऊली जरांगे, यशवंत खंडागळे, अरुण भैय्या निकाळजे उपस्थित होते
पुढे बोलताना आ. सुरेश धस पुढे म्हणाले की,
मी माझ्या राजकीय आयुष्यात कधीही जात-पात धर्म पाहून राजकारण केले नाही
आष्टी पाटोदा आणि शिरूर तालुक्यातील उर्वरित विकास कामांसाठी मी कटिबद्ध असून खुंटेफळ साठवण तलावामध्ये 1.68 टीएमसी पाणी आले आहे, त्यामध्ये आणखी 4.00 टीएमसी पाणी आणून शेती सिंचनासाठी पाणी उपलब्ध करावयाचे आहे, पैठण पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गावरील भूसंपादनाचा प्रश्न मार्गी लावायचा आहे, शिरूर आणि पाटोदा तालुक्यातील दुष्काळी भागासाठी गोदावरी खोऱ्यातील पश्चिम वाहिनीचे पाणी जायकवाडी तलावामध्ये आणून तिथून या दोन्ही तालुक्यासाठी पाणी आणावयाचे आहे, राज्यमार्ग क्रमांक 2 वरील वेडी वाकडी वळणे काढून दर्जेदार करावयाचा आहे, पाटोदा तालुक्यातील तीन मध्यम प्रकल्पांच्या उंची वाढवायची आहे, सुरत चेन्नई या राष्ट्रीय महामार्ग वरील आष्टी तालुक्यातील चुकीचे भूसंपादन झालेले असून त्याची चौकशी लावून शेतकऱ्यांच्या जमिनीवर लबाडांना पैसे मिळू देणार नाही, तसेच सुरत चेन्नई या मार्गाला संभाजीनगर पुणे या महामार्गाला जोडण्याचा प्रयत्न करण्यात येईल तसेच बीड ते नगर हा रस्ता 12 मीटर सिमेंट काँक्रेट चा करावयाचा आहे आष्टी आणि पाटोदा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची हेळसांड होऊ नये म्हणून लवकरच साखर कारखाना उभारणी करणार आहे, वन्यजीव अभयारण्या मध्ये 4200 हेक्टर क्षेत्रा वर भारतीय प्रजातीची वृक्षांची लागवड करण्यात येऊन त्या ठिकाणी पर्यटन स्थळ निर्माण करण्यात येतील कडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा सुशोभीकरण करण्यात येऊन चौकाच्या मध्ये बसवण्यात येईल, डोंगर भागातील शेतकऱ्यांना रानडुकरापासून संरक्षण होईल यावर उपाययोजना करण्यात येतील,
असे सांगून निवडणुकीतील अनुभव विषयी सांगताना ते म्हणाले की,
माझा पराभव व्हावा यासाठी कटकारस्थान करण्यात आले, लोकसभा निवडणुकीत मी पंकजाताई मुंडे यांचे मनापासून आणि प्रामाणिकपणे काम करून स्वतःच्या मराठा समाजाला अंगावर घेण्याचे काम केले बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी त्यांना काळे झेंडे दाखवण्याचे काम केले परंतु माझ्यामुळे आष्टी, पाटोदा, शिरूर तालुक्यामध्ये काळे झेंडे दाखवले गेले नाहीत,मराठा समाजाची प्रचंड नाराजी असताना देखील मतदारसंघांमध्ये 32 हजारांचे मताधिक्य दिले असूनही चुकीच्या माणसांचे ऐकून पंकजाताई मुंडे यांनी मला धोका दिला,
हे माझ्या हृदयाला लागले असून माझ्या वडिलांच्या निधना इतके दुःख मला झाले आहे धनंजय मुंडे यांच्या विषयी बोलताना ते म्हणाले त्यांचा पक्ष वेगळा आहे त्यांच्याकडून मला अपेक्षा नव्हती परंतु तरीही त्यांनी काही कार्यकर्त्यांनी मदत करण्यास सांगितले त्यांची मदत मला झाली आहे
राजकारणात दिलेला शब्द पाळावा लागतो, पंकजाताई यांच्यासाठी मी 20 17 मध्ये जिल्हा परिषद ताब्यात देताना माझ्या राष्ट्रवादी पक्षाचे 5 जि.प. सदस्यांचे बलिदान केले असून पक्षाने त्यांना अपात्र केले हा अपात्रतेचा शिक्का घेऊन माझे हे खंबीर कार्यकर्ते आपले काम करत होते त्यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष हे पद सर्वसाधारण असूनही सविता विजय गोल्हार यांना जिल्हा परिषद अध्यक्षपदी बसवून मी मराठा समाजाचा रोष ओढवून घेतला याची जाणीव विजय गोल्हार यांनी ठेवली नाही, पंकजाताई, आपणा सोबत फिरणाऱ्या माणसांविषयी थोडा विचार करावा, आपण आपला मार्गदर्शक बदलावा असे सांगून आ.सुरेश धस पुढे म्हणाले की,
भीमराव धोंडे यांचे कार्यकर्ते 2019 च्या लोकसभा निवडणुकीत प्रीतम ताई चे विरोधात काम करत होते तेव्हा हे ओबीसी नेते कुठे होते ?यांचे अर्धे आयुष्य झोपेत गेले आणखी कशाकशात गेले हे मी आता सांगत नाही परंतु मी मनात आणले तर त्यांचे उर्वरित आयुष्य जेलमध्ये जाईल परंतु माझी नियत तशी नाही,
मागील विधानसभा निवडणुकीमध्ये भीमराव धोंडे हे पराभूत झाले त्यावेळी मी पैसे घेतले आणि ते परत केले नाही असा बालीश आरोप त्यांनी केला याबाबत त्यांनी भगवान गडावर, नारायण गडावर, तारकेश्वर गडावर, किंवा गहिनीनाथ गडावर वामन भाऊ यांच्या समाधीवर हात ठेवून शपथ घ्यावी असे आव्हान देऊन ते पुढे म्हणाले की,
भीमराव धोंडे यांच्या शिक्षण संस्थेतील संस्थेचे अधिकारी काय काय गैरप्रकार करत आहेत ? याची चौकशी करा आणि यापुढे त्यांनी त्यांचे वर्तन बदलावे असा सज्जड दम दिला
बाळासाहेब आजबे यांचे विषयी बोलताना ते म्हणाले की,
तुम्ही निवडून कसे आलात ?
हे तुम्हालाच माहिती नाही त्यावेळी जयदत्त धस यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज असल्यास मला उमेदवारी नको असे माझ्या घरी येऊन म्हणाला होतात तुम्हाला 1 लाख 26 हजार मते मिळाली होती ती सर्व तुमची आहेत असे सांगत होतात मग त्यातील 1 लाख 5 हजार आता मते कुठे गेली ?
असा सवाल करून ते म्हणाले की,
आगामी पन्नास वर्षात आजबे आडनावाचा माणूस विधानसभा निवडणुकीत दिसणार नाही असे काम आपण पाच वर्षात केले आहे, केवळ पैसे मिळवून चालत नसते, लूट करून चालत नसते, राजकारणामध्ये माणसेही कमवावे लागत असतात असे सांगून बाळासाहेब आजबे आमच्या घराण्याच्या खोडावर घाव घालायला निघाले होते जनतेने त्यांना 21 हजार मते देऊन त्यांची लायकी दाखवली आहे त्यांना मी फरशी कुऱ्हाड आणून देतो त्यांनी कधीही रानात जाऊन घाव घालीत बसावे अशी मिश्किल टिपणी केली
अपक्ष उमेदवार भीमराव धोंडे यांनी मी भाजप उमेदवारी देवेंद्र फडणवीस यांचे कडून आणली आहे त्यामुळे माझ्यावर मराठा समाज नाराज होईल असा जाणीवपूर्वक प्रचार केला म्हणजे मला वंजारी समाजाकडून आणि मराठा समाजाकडून असा दोन्ही कडून विरोध होईल असे कोंडीत पकडण्याचा प्रयत्न झाला परंतु मी गोपीनाथ मुंडे साहेबांचा चेला आहे शिकार करताना किड्या मकोड्याची करावयाची नसते तर वाघाची करायची असते,
मी एवढा साधा सोपा नाही मी झुकणार नाही मोडेन पण वाकणार नाही या बाण्याचा असून मी आता पाच टर्म आमदार असल्यामुळे मी आता वरिष्ठ आहे,
पंकजाताई मुंडे यांच्या पेक्षा मी दहा वर्षे राजकारणात सीनियर आहे तुम्ही माझ्याशी असे वर्तन करावयाला नको होते असे पुन्हा एकदा त्यांनी भावना विवश होऊन सांगितले आष्टी मतदार संघातील मराठा आणि वंजारी समाजाला बरोबर घेऊन मी काम केले आहे आणि करणार आहे यापूर्वी मी सर्वसाधारण जागेवर वंजारी समाजाच्या रेखा गोवर्धन सानप यांना पाटोदा पंचायत समितीच्या सभापती पद दिले त्याचबरोबर अनेक पदाधिकारी मी वंजारी धनगर माळी या इतर मागासवर्गीय समाजातील लोकांना दिले आहे या निवडणुकीमध्ये मला मराठा समाजा बरोबरच वंजारी समाजाने देखील भरभरून मते दिले असून धनगर समाजाने देखील 85 टक्के मते दिले आहेत तसेच अनेक गावांमध्ये माळी समाजाने देखील मते दिले आहेत त्यामुळेच माझा विक्रमी मतांनी विजयी झाला असून मला 1 लाख 40 हजार विक्रमी मते मिळाली आहेत असे सांगितले
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी भीमराव धोंडे यांना विजयी करा असे आवाहन केले होते त्याबाबत टिपणी करताना सुरेश धस म्हणाले की लक्ष्मण हाके यांना माढा येथे 5000 मध्ये पडले आहेत त्यांनी आष्टी विधानसभा मतदारसंघातील तीन लाख 85000 मतांच्या एवढ्या मोठ्या मतदारसंघात कारभार करण्याचा विचार करू नये असे सांगितले