उमेदवारांच्या भाऊगर्दी मध्ये विजयराजे हेच योग्य उमेदवार. – कल्याण आखाडे
गेवराई प्रतिनिधी : सध्याच्या वातावरणाचा फायदा घेण्यासाठी विरोधक गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. परंतु सत्ता भोगलेल्या दोन्ही विरोधकांनी शिवाजीराव पंडित, अमरसिंह पंडित व विजयसिंह पंडित यांच्यावर बोलण्यापेक्षा आपल्या सत्ता काळामध्ये केलेल्या कामावर बोलावे. मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करून मत घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करु नये. गडकरी साहेबांच्या धोरणानुसार झालेल्या रस्त्याचे श्रेय स्वतः घेतात. यांना साधे स्वतःच्या मतदार संघातील गावे माहीत नाहीत अशी खरमरीत टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व महायुतीचे अधिकृत उमेदवार विजयसिंह पंडित यांनी केली. ते पिंपळनेर मधील कॉर्नर सभेमध्ये बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याणराव आखाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य गणपतराव डोईफोडे, अजहर मौलाना यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना ते म्हणाले की, विकास हाच आमचा श्वास व विकास हाच आमचा ध्यास आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष असताना पिंपळनेर साठी प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर केले. आरोग्य केंद्राच्या जागेसाठी स्वतः आर्थिक मदत केली. भैय्यासाहेबांनी पिंपळनेर ची पाणीपुरवठा योजना मंजूर केली. मी निवडून आल्यानंतर पिंपळनेर तालुका व्हावा यासाठी प्रयत्न करीन. आम्ही विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवत आहोत. जिल्हा परिषद निवडणूक पुढे ढकलल्यामुळे जिल्हा परिषद चे उमेदवार विधानसभा निवडणूक लढवत आहेत. त्यांना माहित आहे की, ते निवडून येणार नाहीत. परंतु माझे मत खाण्यासाठी ते उभा राहिलेले आहेत. त्यामुळे त्यांना मतदान करून आपले मत वाया घालू नका. खास करून नव मतदारांनी आपले मत अशा मत विभाजन करणाऱ्या लोकांना न देता विकासाचे व्हीजन असणारे, अठरापगड जाती जमातींना सोबत घेऊन चालणाऱ्या शिवछत्र परिवारातील एक सदस्य म्हणून मला द्यावे. असे आवाहन त्यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ओबीसी सेलचे अध्यक्ष कल्याण आकडे म्हणाले की, लाडकी बहीण योजने अंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला १५०० रुपये त्यांच्या बँक खात्यात दिले आहेत. मुलींसाठी मोफत उच्च शिक्षण योजना, सुमारे ५२ लाख कुटुंबांना वर्षातून तीन गॅस सिलेंडर मोफत दिले जात आहेत. मागेल त्याला सौरपंप, शेती पंपाची वीजबिल माफी, शेतकऱ्यांना एक रुपयात विमा, शेतकरी सन्मान योजना, युवा प्रशिक्षण योजने अंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना सहा हजार ते दहा हजार रुपये दिले आहेत. या सर्व योजना पुढे चालू ठेवण्यासाठी राज्यामध्ये महायुतीचे सरकार येणे आवश्यक आहे. सर्व उमेदवारांच्या भाऊ गर्दीमध्ये विकासाची दृष्टी असणारे, सुसंस्कृत, उच्चशिक्षित असे विजयसिंह पंडित हेच योग्य उमेदवार आहेत. म्हणून विजयसिंह पंडित यांना मोठ्या मतांनी निवडून द्यावे. असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी सुनील पाटील, दादासाहेब खिंडकर, समीर भाई, गणपत डोईफोडे यांनी मतदारांशी संवाद साधला तर चंदू गायकवाड व मित्र मंडळ यांनी घोंगडी देऊन विजयसिंह पंडित यांचा सत्कार केला. यावेळी भारतीय जनता पक्षाचे धनंजय मोरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला.
यावेळी जयभवानी सहकारी साखर कारखाना चे संचालक सुनील पाटील, बळवंत चव्हाण, सांडरवन चे सरपंच प्रशांत लांडे,
बेडकुचीवाडी ग्रुप ग्रामपंचायत चे सरपंच दादासाहेब खिंडकर, राष्ट्रवादी किसान सभेचे जिल्हा उपाध्यक्ष रमेश नागरगोजे, लिंबारुई चे सरपंच उद्धव पैठणे, ताडसोन्ना चे युवा नेते प्रतापराव माने, सुनील शिंदे, रंजेगाव चे सरपंच लक्ष्मण आबुज, रंजेगावचे माजी सरपंच रामभाऊ अबूज, प्रमोद माने, वशिष्ठ कुटे, दत्ता पाटील, राधेश्याम घुमरे, समीर भाई सय्यद, भाऊसाहेब डावकर, किशोर सुरवसे, संजय नरवडे, अमर शेख, राम जाधव, बाबा आरे, गोविंद साठे, रमेश पवार, चंदू गायकवाड यांच्यासह पिंपळनेर गावातील मतदार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.