मोमीनपुरा माझं होमग्राउंड म्हणणारा संदीप क्षीरसागर पाच वर्षात किती वेळा भेटला- अनिलदादा जगताप
बीड, प्रतिनिधी- गेली अनेक वर्ष सत्ता भोगून क्षीरसागरांना केवळ बीडकरांच्या विश्वासाचा घात करत स्वतःचे घरं भरण्याचे काम केले आहे आणि बीडकरांना विकास तर सोडाच पण मूलभूत गरजांपासून वंचित ठेवण्याचे महापाप केले आहे. सत्तेचा ताम्रपट घेऊन क्षीरसागरांच्या पिढ्यानुपिढ्या बीडवर आपली मक्तेदारी चालवत आल्या आहेत व बीड विकासाचा खेळखंडोबा करत आहेत. मोमीनपुऱ्यातील मुस्लिम बांधवांच्या मतदानावर निवडणुन आलेल्या संदीप क्षीरसागरने मोमीनपुरा माझं होमग्राउंड आहे असा दावा ठोकला. मला मुस्लिम बांधवांना फक्त प्रश्न विचारायचा आहे की, गत पाच वर्षात संदीप क्षीरसागर मोमीनपुऱ्यात किती वेळा आला? मुस्लिमांचे कोणच्या अडचणी सोडवल्या? मुस्लिम बांधवांनो हे क्षीरसागर सगळे एक आहेत. यांची खेळी लक्षात घ्या. यावेळी परिवर्तन घडवण्यासाठी मला साथ द्या. मी तुमच्या घरातदारात तुमच्यासमोर वाढलेला माणूस आहे अशा भावना अनिलदादा जगताप यांनी मोमीनपुऱ्यातील प्रचार सभेत व्यक्त केल्या.
काल दि. 17 रोजी रात्री बीड शहरातील मोमीनपुरा भागात बीड विधानसभा अपक्ष उमेदवार अनिलदादा जगाताप यांची सभा पार पडली. या सभेत अनिलदादा जगताप यांच्यासोबत संघर्षयोद्धा मा. मनोजदादा जरांगे पाटील यांच्या टीममधील सदस्य देखील उपस्थित होते.
मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या मुस्लिम बांधवांच्या गरड्यात अनिलदादांची प्रचार सभा पार पडली. अनिलदादा जगताप यांच्या भावनिक अहवानानंतर इन्शाल्ला इसबार दादा आपको चुनके देंगे आशा प्रतिक्रिया व्यक्त करत मोमीनपुऱ्यात मुस्लिम बांधवांनी अनिलदादांना आमदार करण्याचा पक्का निर्धार केला असल्याचे दिसून आले.
*अनिलदादा मुस्लिम बांधवांसाठी सेक्युलर व्यक्ती- प्रा सुरेश नवले*
मुस्लिम बांधवांनो, तुमच्या बहुमूल्य मतांचे विभाजन होऊ देऊ नका. तुमच्या गट्टा मतांचे विभाजन करून भाजपच्या फडणवीसांनी मुख्यमंत्री बनण्याचे षडयंत्र आखले आहे. या षडयंत्रास हाणून पाडा. स्वतःच्या जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देऊन सर्वसामान्य जनतेला स्वतःचा नेता आणि मा. जरांगे पाटील यांना स्वतःचा पक्ष मानणारे अनिलदादा जगताप बीड मतदार संघात तुम्हा मुस्लिम बांधवांसाठी सेक्युलर व्यक्ती आहेत त्यामुळे त्यांना येत्या 20 नोव्हेंबर रोजी अनुक्रमांक 13 शिलाई मशीन या निशाणीवर मतदान करून आशीर्वाद द्या आणि बीड मतदार संघात परिर्वतन घडवून आणा असे माजी मंत्री प्रा सुरेश नवले यांनी प्रचार भाषणात मत व्यक्त केले.