डॉ. ज्योती मेटे यांच्या प्रचारार्थ चऱ्हाटा येथे अभूतपूर्व सभा
मी समाजासाठी माझे कुंकू गमावले ; मझ्या जीवनातील अंधकार बॅटरी टॉर्चला मतदान करून दूर करा – डॉ. ज्योती मेटे
बीड (प्रतिनिधी) बीड मतदार संघातील लोकप्रिय महिला उमेदवार डॉ. ज्योती विनायकराव मेटे यांना मतदारांचा वाढता प्रतिसाद मिळत असून काल त्यांची लिंबागणेश सर्कलची चऱ्हाटा पंचायत समिती गणाची जाहीर सभा चऱ्हाटा येथे पर पडली लोकनेते विनायकराव मेटे यांनी हयातीत केलेल्या कामाची पोचपावती म्हणून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा मतदारांनी निश्चय केला आहे. या सभेप्रसंगी डॉ. ज्योती मेटे भाऊक होत मी समाजासाठी आपलं कुंकू गमावलं आहे. या समाजाकडून फक्त एकच मागणी आहे जनतेने बॅटरी टॉर्च समोरील बटन दाबून मझ्या जीवनातील अंधकार दूर करावा आणि मझ्या पदरात मतदानाचे दान टाकावे आणि आपल्या साथीच्या जोरावर मी मतदार संघाचा अंधकार दूर करेल अशी भावनिक साद यावेळी त्यांनी घातली.
मतदारसंघाच्या लोकप्रिय अपक्ष उमेदवार डॉ. ज्योती विनायकराव मेटे या “बॅटरी टॉर्च” हे निवडणूक चिन्ह घेवून गावोगावी पोहचल्या आहेत. दररोजच्या जाहीर सभेना त्यांना जनतेचा प्रतिसाद मिळत आहे. लिंबागणेश सर्कलच्या चऱ्हाटा येथील सभेसाठी अभूतपूर्व गर्दी झाली होती . बीड मतदार संघात पसरलेला अंधार दूर करण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात बॅटरी टॉर्च निवडणूक चिन्ह घेऊन उतरले आहे. लिंबागणेश सर्कल मध्ये लोकनेते विनायकराव मेटे साहेबांनी अनेक विकास कामे केली आहेत. हा बालाघाट परिसर साहेबांना मानणारा आणि त्यांच्या विचारांचा आहे. आणि येथील जनता माझ्या झोळीत मताचे दान टाकल्याशिवाय राहणार नाही असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रसंगी शिवसंग्राम प्रदेश उपाध्यक्ष प्रभाकर कोलंगडे, शिवसंग्राम जिल्हाध्यक्ष नारायणराव काशीद , जिल्हा सरचिटणीस अनिल घुमरे, सचिन कोटुळे , कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक पंडित माने, ॲड मनीषा कुपकर, बबनराव उबाळे, अबा येळवे, हरी भोसले आदी उपस्थित होते.