जात-पात,धर्म,पंथ न पाहता रुग्णसेवा हीच ईश्वर सुरेश धस जोपासली सामाजिक बांधिलकी सेवा
आष्टी प्रतिनिधी :माजी राज्यमंत्री सुरेश धस यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून १ कोटी २ लाख ७८ हजार २०५ रुपयांचा निधी मिळवून दिला. त्यामुळे अनेक लोकांचे जीव वाचले आहेत. मुख्यमंत्र्यांचा निधीतून व धर्मादाय रुग्णालय येथील जीवनदायी आरोग्य योजना सवलतीचा माध्यमातून कोरोना काळ आणि त्या पश्चात ३१ जानेवारी २०१९ ते २७ सप्टेंबर २०२४ पर्यंत सुरेश धस यांच्या शिफारसीमुळे १३० रुग्णाला १ कोटी २ लाख ७८ हजार इतका निधी धनादेश मिळवून दिला आहे.आष्टी मतदार संघातील माजी आमदार सुरेश धस हे रुग्णासाठी अहोरात्र मदत हात पुढे करत असतात.
त्यांच्या काळात कोटीचा निधी मंजूर केला गेला.महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार व मुख्यमंत्री सहायता कक्ष प्रमुख मंगेश चिवटे व त्यांचे सहकारी शार्दुल भणगे आणि इतर सहकारी यांचे सहकार्य आणि धस व त्यांचे वैद्यकीय मदत विभागाचे सहकारी यांच्या पाठपुरामुळे आष्टी मतदारसंघातील रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून भरघोस मदत मिळवून दिला आहे.समाजातील गोरगरीब,कष्टकरी आदिवासी यांच्यासाठी माजी राज्यमंत्री सुरेश धस भारतीय जनता पार्टी कार्यालयामध्ये रुग्णासाठी गेली २५ वर्षेपासून दुर्धर आजार,कॅन्सर,अपघात , हृदयरोग , रीप्लेसमेंट लहान मुलांच्या शस्त्रक्रिया,वाल,डायलिसिस अशा वीस विविध आजारांसाठी निःशुल्क मदत करत आहेत. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळून देत आहेत. या मदतीमध्ये सुरेश धस यांनी कधीच जात-पात, धर्म, पंथ न पाहता रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा समजून प्रत्येक रुग्णाला मदत करत माझी एक बांधिलकी जोपासली असल्याने येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांना या रुग्णसेवेचा अधिक फायदा होत असल्याच्या बोलले जात आहे. आजारातून बरा झालेल्या रुग्णाच्या चेहऱ्यावरील हसू हीच आपली ही आपली जनसेवेची पावती मानतो असे 231 आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी शिवसेना रिपाई आठवले गट व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार धस सुरेश रामचंद्र हे गाव भेट दरम्यान मतदारांशी संवाद साधताना विविध ठिकाणच्या भाषणातून सांगत असतात.