पिंपळनेर सर्कलमध्ये विजयसिंहाच्या प्रचाराचा झंझावात*
गेवराई प्रतिनिधी : आमदार हा तालुक्याचा प्रतिनिधी असतो, त्यांने तालुक्याच्या जनतेची काळजी वाहायची असते, विकास कामे करायची असतात, लोकांच्या सुखदुःखाला धावून जावे लागते या बाबीच विद्यमान आमदार विसरले आहेत. माजी आणि आजी आमदारांचा अनुभव आपण घेतलेला आहे. लोककल्याणाच्या आणि विकासाच्या योजना राबविण्यासाठी मला या तालुक्याचे नेतृत्व करायचे आहे. मला आमदारकी माझ्यासाठी नव्हे तर तुमच्यासाठी हवी आहे असे प्रतिपादन महायुतीचे उमेदवार विजयसिंह पंडित यांनी केले.
गेवराई विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार विजयसिंह पंडित यांनी मतदारसंघात आपल्या झंजावाती प्रचार दौऱ्याने वातावरण ढवळून काढले आहे. पिंपळनेर सर्कलमध्ये, वलीपूर, केसापुरी, परभणी, बोरदेवी, सुर्डी, मुगगाव, पिंपळादेवी, पाटेगाव, लिंबारुई, बेडूकवाडी, सांडरवन, लोणी, शहापूर आदी विविध गावांना भेटी देऊन मतदारांशी संवाद साधला.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, पिंपळनेर सर्कल गेवराई विधानसभा मतदारसंघांमध्ये आल्यापासून तीन टर्म मध्ये दोन वेगवेगळ्या आमदाराचा अनुभव आपण सर्वांनी घेतलेला आहे. हे दोन्ही आमदार म्हणजे गेवराई शहरालाच विधानसभा मतदारसंघ समजतात की काय? अशी शंका येते. विद्यमान आमदार गेवराई शहरातील दोन – तीन कामाचे फ्लेक्स बनवून इकडच्या सर्कल मध्ये खेडोपाडी दाखवत आहेत. स्विमिंग पूल व नाट्यगृह हे कोल्हेर रोडला बनवून त्याची जाहिरात पिंपळनेर सर्कल मध्ये करण्याला काय अर्थ आहे? अशी टिका त्यांनी विरोधकांवर केली.
याप्रसंगी जयभवानी सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुनील पाटील, वलीपूरचे सरपंच रामेश्वर घुमरे, संजय नरवडे, संतोष डावकर, बाळासाहेब कराडे, सोमनाथ वडमारे, धनंजय वरकड, माजी सरपंच बद्री वरकड, परभणी केसापूरीचे सरपंच महेश शिंदे, वडवणीचे नगराध्यक्ष भारत जगताप, लिंबारुईचे सरपंच उद्धवराव पैठणे, उपसरपंच मुकुंद कवचट, बोरदेवी नवापूरचे उपसरपंच विठ्ठल गायकवाड, अभिमान कवचट, सुरेश घुमरे अंगद किवणे, प्रदीप भुमरे, रामेश्वर घुमरे, बळवंत चव्हाण, भाऊसाहेब डावकर, संतोष डावकर हिरापूरचे सरपंच शाहेब पटेल, राधेश्याम येवले, गणेश सावंत, दादा खिंडकर, प्रतापराव माने, मुगगावचे सरपंच अरविंद दुबाले, श्रीकिसन कदम, वचिष्ठ वाघ, मनोज तात्या हजारे, महेश ढेरे, नगरसेवक राधेश्याम येवले, किशोर लोणकर, बंडूपंत घूंबरे, अरुण राऊत, जितेंद्र घुगे, वसीम सय्यद, शकील सय्यद, बाळू कराळे, रहीम सय्यद, अमोल माने, जालिंदर माने, विशाल शिंदे, विनोद कौचट, माजी सरपंच विजय शिंदे आदिनाथ दुबाले यांच्यासह पिंपळनेर सर्कल मधील विविध गावचे ग्रामपंचायत सदस्य सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन, सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विजयसिंह पंडित यांच्या उपस्थितीत बोरदेवीचे माजी उपसरपंच राष्ट्रवादीत
==============
बोरदेवी (नवापूर) माजी उपसरपंच विठ्ठल गायवळ, गणेश गायवळ, विष्णू गायवळ, गोविंद गायवळ, निखिल गायवळ, प्रदीप जाधव, मोहन गायवळ, शुभम कवचट, माऊली कवचट, रमेश कवचट, दत्तात्रय नानवटे व रवींद्र गायकवाड यांनी विजयसिंह पंडित यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.