प्रारंभ वृत्तसेवा
बीड : ज्ञानराधा मध्ये हजारो कोटींचा घोटाळा केल्याप्रकरणी सुरेश कुटे, अर्चना कुटे, आशिष पाटोदेकर यासह यशवंत कुलकर्णी यांच्यावर अनेक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे नोंद आहेत. यशवंत कुलकर्णी व त्यांचा मुलगा वैभव कुलकर्णी यांना पुणे आर्थिक गुन्हे शाखेने पुण्यामध्ये अटक केली होती. यानंतर त्यांना बीड आर्थिक गुन्हे शाखेच्या ताब्यात देण्यात आले होते. आज (ता. ०१) बीड येथील न्यायालयात त्यांना हजर करण्यात आले, यावेळी न्यायालयाने यशवंत कुलकर्णी, वैभव कुलकर्णी यांना पाच दिवसाची पोलीस कुठे पोलीस कोठडी सुनावली आहे.
सर्वसामान्य ठेवीदारांचा विश्वास संपादित करत ज्ञानराधाने खूप कमी दिवसांमध्ये कोटी रुपयांच्या जमा करुन घेतल्या होत्या. विशेष म्हणजे ठेवीदारांना जास्त व्याजाचे आमिष दाखवल्यामुळे ठेवीदार ज्ञानराधाकडे आकर्षित झाले होतै. ज्ञानराधा मधील सर्व पैसा कुटे ग्रुपने तिरुमला समूहाकडे वळवला, प्रॉपर्टी खरेदी केली यासह इतरही गैरप्रकार केल्यामुळे ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत देण्यास ज्ञानराधाने असमर्थता दाखवली. यानंतर ज्ञानराधा च्या सर्व मंडळींवर अनेक ठिकाणी गुन्हे नोंद करण्याची प्रक्रिया सुरू झाली. यातच मुख्य भूमिकेत असलेले यशवंत कुलकर्णी गेल्या अनेक महिन्यापासून फरार होते, त्यांना पुणे पोलिसांनी पुण्यातूनच अटक केली होती. यानंतर त्यांना बीड आर्थिक गुन्हे शाखेच्या ताब्यात देण्यात आले होते. आज यशवंत कुलकर्णी व त्यांचा मुलगा वैभव कुलकर्णी या दोघांनाही बीड येथील न्यायालयामध्ये हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने यशवंत कुलकर्णी व वैभव कुलकर्णी यांना 5 सप्टेंबर पर्यंत ची पोलीस कोठडी सुनावली आहे.