बीडकरांनो, उघडा डोळे बघा नीट
बीड प्रतिनिधी :- स्वराज्यनगर भागाचा दिवसेंदिवस विस्तार होत आहे. मात्र या भागात अजुनही मुलभूत सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध झालेल्या नाहीत. या भागातील रस्ते हा नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रस्ते नसल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो. यामुळे शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून बीड शहरातील रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळवून आणाली. मात्र आमदार संदीप क्षीरसागर यांनी या कामाविरोधात हायकोर्टात जनहित याचिका (क्र. 15520) दाखल करुन विकास कामांना खिळ घालून दुधात मीठाचा खडा टाकला आहे. असा आरोप शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी पत्रकार परिषदेत केला. बीडकरांनो, उघडा डोळे बघा निट आमदाराचा प्रताप असे मुळूक यांनी म्हटले आहे.
शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळूक म्हणाले की, स्वराज्यनगर, शिवाजीनगर , गणपतीनगर या भागातील रस्त्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पावसाळ्यात तर विद्यार्थ्यांपासून नागरिकांपर्यंत सर्वांचेच मोठे हाल होतात. यामुळे आम्ही थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेच या भागातील रस्त्यांचा प्रश्न मांडला. रस्ते नसल्याने रहिवाश्यांना दैनंदिन कामे करताना तारेवरची कसरत करावी लागते हे आम्ही मुख्यमंत्र्यांसमोर मुद्देसुदपणे मांडत 17 नोव्हेंबर 2023 रोजी निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे बीड नगर पालिकेअंतर्गत स्वराज्यनगर भागातील 2 कोटी रुपयांच्या रस्ते कामांना मंजुरी देण्याची मागणी केली होती. याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत बीड नगर परिषदेला दोन कोटींचा निधी मंजुर करुन प्रभाग क्र.22 स्वराज्यनगर येथे 8 रस्ते, नाल्यांच्या कामांना मंजुरी दिली. एवढेच नाही तर 8 रस्त्यांची कामांच्या प्रशासकीय मान्यतेसाठी फाईल जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग झाली होती. तेव्हा आमदार संदीप क्षीरसागर यांनी या कामािवरोधात हायकोर्टात याचिका दाखल केल्याची माहिती मिळाली. स्वराज्यनगर भागातील नागरिकांचे अनेक दिवसांचे रस्त्याचे स्वप्न पूर्ण होण्याच्या मार्गावर असताना टक्केवारी आमदार संदीप क्षीरसागर यांनी दुधात मीठाचा खडा टाकला. स्वत: काही करायचे नाही आणि दुसऱ्याने काही केले तर ती कामे अडवायाची अशी भूमिका आमदार क्षीरसागर यांची आहे. या कामाविरोधात याचिका दाखल करुन शिवसेनेने पाठपुरावा करुन आणलेली िवकास कामात खिळ घालण्याचे काम केल्याचा आरोप जिल्हाप्रमुख ,मुळूक यांनी केला आहे.
————–
आमदारांनी टक्केवारीसाठी हे नीच कृत्य केले
आमदार संदीप क्षीरसागर यांनी आमदार झाल्यापासून बीड शहर व मतदारसंघात विकास कामे केल्याचा आव आणला आहे. वास्तविक पाहता टक्केवारी घेतल्याशिवाय ते काेणतेच काम करत नाही. बीड शहरातील झालेली रस्त्यांची दुरावस्था, अस्वच्छता, दुर्गंधी ही आमदार क्षीरसागरांनी केलेल्या विकासकामांची प्रचिती असून याचा परिणाम म्हणून साथरोगाने सर्व हॉस्पिटल हाऊसफुल होत आहेत. स्वत:चे कार्यकर्ते तर सोडाच पण स्वत: घरही नीट सांभाळता न येणाऱ्या आमदाराने कधीही स्वत:शहराचा विकास केला नाही. मात्र टक्केवारीसाठी दुसऱ्यांनी केलेल्या कामांना आठकाडी घालण्याचे काम करत असल्याचा आरोप शिवसेना जिल्हाप्रमुख , सचिन मुळूक यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
————————-
न्यायालयीन लढाई लढू; आमदारांना वेसन घालू
शिवसेनेने पाठपुरावा करुन मंजूर करून आणलेल्या कामांना आमदार संदीप क्षीरसागर यांनी हायकोर्टात याचिका दाखल करुन विकास कामांना घातली खिळ घातली आहे. आमदार क्षीरसागर केवळ टक्केवारीचे राजकारण करतात तर दुसरे क्षीरसागर काहीच बोलत नाहीत. आमदार क्षीरसागरांनी आम्ही आणलेल्या कामात खोडा घालण्याचे काम केले असले तरी आम्ही सामंजस्याची भूमिका घेतली होती. मात्र आमदारांनी आमच्या विनंतीला दाद दिली नाही. या प्रकरणात बीड नगर पालिकेनेही आपली भूमिका हायकाेर्टात मांडली आहे. आता विकास कामांसाठी आम्ही न्यायालयीन लढाई लढणार असून आमदार क्षीरसागरांना वेसन घालणार असल्याचे मुळूक जगताप म्हणाले
——————-
शिवसेनेने मंजुर करुन आणलेली कामे
बीड नगर परिषद अंतर्गत प्रभाग क्र. 22 मध्ये लहुराव मुळूक ते छगन गायकवाड (स्वराज्य नगर) येथे रस्ता व नाली बांधकाम करणे, लखन माने ते राहुल जावळे (स्वराज्य नगर) येथे रस्ता व नाली बांधकाम करणे, विनोद निकम ते अशोक थांडे (स्वराज्य नगर) येथे रस्ता व नाली बांधकाम करणे, अशोक कदम ते राहुल बोले (स्वराज्य नगर) येथे रस्ता व नाली बांधकाम करणे, इंद्रजीत पांचाळ ते राजु हुरकुडे (स्वराज्य नगर) येथे रस्ता व नाली बांधकाम करणे, इंद्रजीत सोपान सुसकर ते मनोज जोशी (स्वराज्य नगर) येथे रस्ता व नाली बांधकाम करणे, आदिती किराणा ते राहुल बहिर (स्वराज्य नगर) येथे रस्ता व नाली बांधकाम करणे, गोरखनाथ झोडगे ते इंगाले (स्वराज्य नगर) येथे रस्ता करणे या कामांचा समावेश आहे. ही सर्व कामे आमच्या पाठपुराव्याने मंजूर झाली आहेत. मात्र डाेमकावळा असलेल्या आमदार संदीप क्षीरसागर यांनी ही कामे अडवली आहेत असा आरोप , मुळूक यांनी केला आहे.
या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल दादा जगताप, महिला आघाडी जिल्हाप्रमुख बांगर ताई ,जिल्हा संघटक योगेश नवले, सुनील सुरवसे, उपजिल्हाप्रमुख संतोष जाधव, अजय जाधव, विधानसभा प्रमुख सुनील अनभुले, युवा सेना जिल्हाप्रमुख सुमित कोळपे, तालुकाप्रमुख मकरंद उबाळे, शहर प्रमुख नंदकिशोर पिंगळे सह स्वराज्य नगर गणपत नगर शिवाजीनगर भागातील नागरिक उपस्थित होते