तुम्ही पंकजाताईंना खासदार करा, मोदीजी आणि मी डबल इंजिन लावून बीड जिल्हा विकास कामात देशात नंबर एकचा करू..!
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची माजलगावात जाहीर सभा
बीड : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरीनी महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारासाठी माजलगावच्या मोंढा मैदानावर जाहीर सभा घेतली. त्यात बोलताना पंकजाताईंना तुम्ही खासदार करा या जिल्ह्याच्या विकासाची जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मी स्वत: घेत पालकत्व स्वीकारतो. विकसाच्या प्रक्रियेत बीड जिल्हा देशात नंबर एकचा करून दाखवू हे सांगताना पंकजा केवळ स्व. गोपीनाथ मुंडेची मुलगी म्हणून नव्हे तर तिने राजकारणात आपले कर्तृत्व आणि नेतृत्व सिद्ध करू दाखवले. मोदीजी आणि मी स्वत: डबल इंजिनच्या रूपाने तिच्या पाठीमागे खंबीर पणे उभा राहू हे सांगताना तुम्ही पंकजाताईला दिल्लीला पाठवले तर जिल्ह्यासह राज्याच्या विकासाची ललकार बनवू शकते, कारण विकासासाठी सत्ते सोबत संघर्ष करण्यासाठी तिच्यात क्षमता आहे. राजकारणात माणूस जातीने नाही तर गुणाने मोठा होतो हे सांगताना छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन काम करतो. जो करेगा जात की बात, उसको पडेगी भारी लाथ असे सांगत त्यांनी स्व. गोपीनाथराव मुंडे हे खऱ्या अर्थाने सामान्य जनतेचे नेते होते. मुंडे- महाजनामुळे राज्यात भाजपाचा विस्तार झाला. माझ्याही राजकीय आयुष्यात त्यांचे मार्गदर्शन लाभले.
आपल्या विस्तारीत भाषणात बोलताना सुरवातीलाच गडकरी म्हणाले कॉँग्रेस ने देशात 60 वर्ष व्यवस्था चालवताना गरीबी हटवाचा नुसता नारा दिला. पंडित नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी, राहुल गांधी वीस कलमी कार्यक्रम हाती घेतल्याचे सांगत देशातील सामान्य जनतेला विकासापासून वंचित ठेवले. मात्र अवघ्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉँग्रेसने जे 60 वर्षात केले नाही, ते करून दाखवताना “सबका साथ सबका विकास” सर्व स्तरावर सर्वांगीण विकास करताना या प्रक्रियेत गरीब माणसाला आणून सोडले. देशाची प्रगती खऱ्या अर्थाने यांच्या काळात झाली. कदाचित जास्तीचा विकास केला म्हणूच इंडि आघाडीवाले आमच्यावर बेताल आरोप करतात असे ते म्हणाले.
बीड जिल्ह्यातल्या रस्ते विकासावर मी बोलणार नाही कारण आम्ही काय काम केले हा अनुभव तुम्ही घेतलाच असल्याचे सांगत त्यांनी खासदार प्रीतमताई यांनी पुढाकार घेतलेल्या पकजाताईच्या एका पत्रावर जिल्ह्यातील दहा हजार कोटी रुपये खर्चाच्या रस्ते विकास कामाला मंजूरी दिल्याचे सांगितले. कामाची यादी वाचुंन दाखवताना त्यांनी बीडच्या शिवाजी चौक ते बार्शी नाका सुमारे पाच कोटी रुपय, आष्टी ते अहमदनगर 50 किमीसाठी 640 कोटी रुपय, पोहणेर सीरसाळा 25 कोटी, धारूर आडस 17 किमी, परळी सिरसाळा पांगरी नदीवर मोठा पूल आणि वॉटर स्टोरेज, तर माजलगाव केज धारूर रस्ता खराब झाला. तो गुत्तेदारांमार्फत दुरुस्ती करून घेण्याची हमी दिली. सी आर एम योजने अंतर्गत करोडो रुपय दिल्याचे त्यांनी सांगितले. बीड जिल्हा विकासाची मी केवळ गॅरंटी नाही तर पालकत्व घेतो. तुम्ही पंकजाताईला मतदान करून दिल्लीला पाठवा. आपला जिल्हा देशात विकासाच्या बाबतीत नंबर एकचा बनवल्या शिवाय राहणार नाही हे सांगताना पंकजा माझी मुलगी असल्याचा आवर्जून उल्लेख त्यांनी केला. राजकारणात जाती पातीचे प्रयोग समाजासाठी घातक ठरू शकतात. नेतृत्वाच्या अंगी असलेले गुण आणि कर्तुत्व हा विचार मतदारांनी करायला हवा. गोपीनाथराव मुंडेची आठवण काढत त्यांनी माझ्या राजकीय जीवनात त्यांचा सिंहाचा वाटा असल्याचे सांगितले. रात्री बारा वाजता कोणाचा फोन आला तर, उचलून सामान्य लोकांची कामे करणारा नेता म्हणजे मुंडे साहेब. माणसं जातीच्या आधारावर नाही तर, कर्तुत्वाच्या आधारवार मोठी होत असतात. पंकजाताईचे कर्तुत्व आणि नेतृत्व क्षमतेचे असून त्यांच्या नेतृत्वाखाली बीड जिल्ह्यासह मारठवाड्याचा आणि राज्याचा विकास झाल्या शिवाय राहणार नाही हा विश्वास त्यांनी दिला.
10 हजार कोटी रस्ते विकासाला दिल्या बद्दल,
पंकजाताईने गडकरींची मानले आभार ..!
या जाहीर सभेत भाषणाच्या सुरवातीलाच आदरणी गडकरी असा उल्लेख करत नितीन गडकारींनी माझ्या वडिलांच्या सोबत राजकीय जीवनात काम केले. माझ्यासाठी ते नेता नसून काका असल्याचा उल्लेख त्यांनी केला. विकासाचे महापुरुष अशी ओळख त्यांची असून आपल्या बीड जिल्ह्यात रस्ते विकासासाठी केंद्रात सरकार आल्यानंतर माझ्या एका पत्रावर सुमारे दहा हजार कोटी काम मंजूर केल्याबद्दल त्यांनी जाहीर सभेत त्यांचे आभार मानले. बीड जिल्ह्यात आम्हाला तरुणांना रोजगार मिळावा महणून एक मोठा उद्योग आणि गरिबांच्या आरोग्य रक्षणासाठी कॅन्सर हॉस्पिटल उभा करायचे असून आमचे पालकत्व स्वीकारावे असे सांगत राजकारणात काम करताना मी केवळ विकासाचे राजकारण केल्याचा उल्लेख त्यांनी केला. या सभेला भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री आ. बबनराव लोणीकर, आ. प्रकाश दादा सोळूके, आ. लक्ष्मण पवार, मोहन जगताप, रमेशराव आडसकर, देविदास राठोड, बाबुराव पोटभरे, नितीन नाईकनवरे, डॉ. योगेश क्षीरसागर, डॉ. प्रकाश आनंदगांवकर, अरुण आबा राऊत, आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री गिरी यांनी केले तर आभार प्रदर्शन शहर अध्यक्ष दळवी यांनी मांडले. अक्षय तृतीयाचा दिवस असताना देखील मोंढा मैदानावर पार पडलेल्या सभेला मोठ्या संखेने लोक उपस्थित होते.