लवकरच सुरेश कुटे संवाद साधला
प्रारंभ न्युज
बीड : बीड जिल्ह्यामध्ये कुटे ग्रुपने एक अस्तित्व निर्माण करून जगभरामध्ये आपली एक वेगळी छाप निर्माण केली. बीड जिल्ह्याचे नाव राज्यातच नाही तर देशभरात, जगभरामध्ये गाजवले. कुटे ग्रुपचे सर्वेसर्वा सुरेश कुटे ग्रुपच्या तिरूमला या ठिकाणी आयकर विभागाने काही ठिकाणी तपासणी मोहीम सुरू केल्यानंतर काही लोकांनी ज्ञानराधा बुडाल्याच्या अफवा पसरवल्या होत्या. यानंतर सर्व शाखांमध्ये लोकांनी गर्दी केली होती. परंतु बॅंकेत येणार्यांची गैरसोय होऊ नये यासाठी, आज बँकेच्या वतीने सर्वच शाखेच्या ठिकाणी मंडप, खुर्च्या टाकण्यात आले आहेत. पाण्याची सोय सुद्धा करण्यात आली आहे. यासह सर्वच शाखेतील व्यवहार सुरळीत सुरु आहेत. ज्ञानराधा बँक सुरक्षित असून तुमचा पैसाही सुरक्षित असल्याचे बँकेच्या वतीने कळविण्यात येत आहे. लवकरच सुरेश कुटे सर्वांशी संवाद साधणार असल्याची माहिती मिळत आहे.