गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक
बीड :- गणेशोत्सव काळात शांतता व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टिकोनातून सर्वच अधिकाऱ्यांनी खबरदारी घ्यावी उत्सव शांततेत पार पडेल या दृष्टिकोनातून काम करावे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी आज केले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृह शांतता समितीची बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली बैठकीला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर तसेच निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी आणि जिल्हा पुरवठा अधिकारी ओंकार देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
गणेशोत्सव काळात गणेश स्थापनेपासून गणपती विसर्जनापर्यंत दहा दिवसांच्या कालावधीत सर्वत्र आवश्यक उपाययोजना करण्यात यावी तसेच गणेश आगमन आणि विसर्जन पूर्वतयारीचा आढावा देखील आतापासूनच घ्यावा असे जिल्हाधिकारी म्हणाल्या.
या बैठकीला जिल्ह्यातील सर्व तालुका तसेच उपविभाग स्तरीय अधिकारी उपस्थित होते या सर्वांना यावेळी गणेशोत्सव काळात शासनातर्फे घेण्यात येणाऱ्या गणेशोत्सव स्पर्धेची देखील माहिती देण्यात आली.
गणेशोत्सव हा पर्यावरण पूरक गणेशोत्सव ठरला पाहिजे या दृष्टिकोनातून सर्वांनी प्रयत्न करावे व या कालावधीत सर्वत्र स्वच्छता राहील यासाठी नियोजन करावे असे यावेळी सांगण्यात आले.
गणेश मूर्ती शक्यतो शाडू मातीची असावी असे नियोजन अनेक मंडळांनी केले आहे प्लास्टर ऑफ पॅरिसचा वापर करण्यात येऊ नये असेही शासनातर्फे जारी करण्यात आलेल्या याबाबतीच्या माहितीत म्हटले आहे.