मराठा आरक्षणासाठी श्री.मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी बीड जिल्यातील शिक्षक एकवटला।
बीड : सरसकट मराठा आरक्षण मिळण्यासाठी “सकळ मराठा शिक्षक, प्राध्यापक,कोचिंग क्लासेस प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीची बैठक आज शहरातील प्रा.सत्येंद्र पाटील यांच्या घरी संपन्न झाली. या बैठकीत उद्या दि.८/९/२३ पर्यंत शासनाने सरसगट आरक्षणासंदर्भात ठोस निर्णय घेतला नाही तर दि. ९/९/२३ रोजी बीड जिल्यातील शिक्षक बीड उपोषणास बसण्याचा निर्णय झाला. या प्रसंगी मोठ्या संख्येने शिक्षक,प्राध्यापक, कोचिंग क्लासेस प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या ठिकाणी मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी जो लढा उभा केला आहे. या लढ्याला आता राज्यभरातून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. या लढ्यामध्ये आता शिक्षक सुद्धा उतरले असून आज शहरांमध्ये एक बैठक झाली असून या बैठकीमध्ये शासनाने उद्या संध्याकाळपर्यंत मराठ्यांना सरसकट आरक्षणासंदर्भात ठोस निर्णय घेतला नाही तर शनिवारी बीड जिल्ह्यातील शिक्षक हे उपोषण आंदोलन करणार आहेत. हे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असणार असून या आंदोलनामध्ये जिल्ह्यातील हजारो शिक्षक सहभागी होणार असल्याची माहिती या बैठकीमध्ये देण्यात आली.