मुंबई – कृषीमंत्री ना.धनंजय मुंडेंच्या संवेदनशीलतेची आणि आपल्या सहकाऱ्यांबाबतची संवेदनशीलता अनेक वेळा दिसुन आलेली आहे. विशेषत: परळीतील आपल्या सहकाऱ्यांच्या बाबतीत तर सुख दुःखात प्रचंड हळव्या मनाचे होतात हे अनेक प्रसंगात दिसलेले आहे. आज (दि.६) पुन्हा एकदा असाच प्रसंग मुंबईत बघायला मिळाला. परळीतील माजी नगराध्यक्ष दिपकनाना देशमुख व अन्य सहकाऱ्यांचा आज पहाटे मुंबईत आपघात घडला; धनंजय मुंडेंना याबाबत माहिती मिळताच आपल्या हातची सर्व महत्त्वाची कामं सोडून कृषीमंत्री धनंजय मुंडे रुग्णालयात धावून आल्याचे दिसून आले.
कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचे आपल्या सहकाऱ्यांबद्दल चे प्रेम व तळमळ ही सर्वश्रुत आहे. सहकाऱ्यांच्या सुख दुःखात तत्परतेने धावून जाणारा व कार्यकर्त्याला जीवापाड जपणारा व प्रेम करणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे.
आज दिनांक 6 रोजी मुंबई येथे ना. धनंजय मुंडे यांचे सहकारी असलेले परळीचे माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यांच्यासह अन्य तीन जण मुंबईकडे जात असताना पहाटे 6 च्या सुमारास चेंबूर कडून वडाळा कडे जाणाऱ्या बोगद्यासमोरील डिव्हायडरला धडकून त्यांच्या गाडीचा अपघात घडला. या अपघातात दीपक देशमुख यांच्यासह, हनुमंत आगरकर, अर्जुन सोळंके, विष्णू आटोळे यांनाही काही दुखापत झाली आहे. अपघातानंतर चालकाने धनंजय मुंडे यांना फोन करून याबाबत कळवले. त्यानंतर त्यांचे स्वीय सहाय्यक प्रशांत जोशी, वैद्यकीय मदत कक्षाचे काम पाहणारे संतोष धिवर, टेलिफोन ऑपरेटर रितेश राणे आदींनी समन्वय साधत तात्काळ दवाखाना जवळ केला. सायन येथे प्राथमिक उपचारानंतर जखमींना भाटिया हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून, सर्वांचीच प्रकृती स्थिर आहे व पुढील उपचार सुरू आहेत.
धनंजय मुंडे हे देखील आपल्या सर्व नियोजित बैठका सोडून त्याचबरोबर कॅबिनेटची बैठक असताना ती सोडून तातडीने जखमी लोक रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच रुग्णालयात हजर होते.
आपल्या सहकाऱ्याचा अपघात झाल्याचे कळताच अतिशय तळमळ व तत्परतेने धनंजय मुंडे स्वतः कॅबिनेट बैठक सोडून रुग्णालयात आले व त्यांच्या उपचाराची सर्व ती व्यवस्था स्वतः जातीने लक्ष देऊन केल्याचे पाहायला मिळाले. त्याचबरोबर सर्वांना धीर देताना ते दिसले अतिशय संवेदनशील असा हा प्रसंग आज बघायला मिळाला.