परत 31 लाखाचा गुटखा आयपीएस पंकज कुमावत यांच्या पथकाने पकडला–गुटखाकिंगी महारुद्र मुळेसह इतर दोन आरोपींवर गुन्हा नोंद
–जिल्ह्यात मुळेसह इतर चौघांचा गुटखा सुसाट
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : गेल्या काही वर्षापासून जिल्ह्यात घोडका राजूरी येथील महारुद्र मुळे हे जिल्हाभरात गुटख्याचा व्यापार करत आहेत. मुळेवर आज पर्यंत अनेक गुन्हे नोंद करण्यात आलेले आहेत. परंतू ते काही गुटख्याचा धंदा बंद करत नसल्याचे दिसत आहे. यामुळे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी मुळेवर एमपीडीए अंतर्गत कारवाई करत मुळेची हर्सूल कारागृहात रवानगी करावी, म्हणजे जिल्ह्यात होणाऱ्या गुटखा विक्रीला ब्रेक लागले. आज परत आयपीएस पंकज कुमावत यांच्या पथकाने 31 लाखाचा गुटखा पकडला. हा गुटखा सुद्धा मुळेचा असून मुळेच्या चालकाने कारवाई साठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंगावर गाडी चालवण्याचे धाडस केले. या प्रकारावरुन दिसते की, यांना पैशाची किती मस्ती आलेली आहे. यामुळे पोलीस अधीक्षक साहेब असल्या आरोपींना खाकीची हवा दाखवाच, म्हणजे भविष्यात पोलीसांच्या अंगावर गाडी घालण्याचे धाडस कोणी करणार नाही.
आयपीएस पंकज कुमावत यांच्या पथकाला माहिती मिळाली होती की, बीड मध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा येत आहे. याच अनूषंगाने पंकज कुमावत यांच्या पथकातील पोलीस कर्मचारी नवले यांनी पाली पसिरात सापळा लावला होता. परंतू संबंधित आयशर चालकाने पळ काढण्यासाठी पोलीस कर्मचारी नवले यांच्या अंगावर गाडी घालण्याचा पर्यंत केला. यात पोलीस कर्मचारी यांच्या दुचाकीचे नुकसान झाले. यानंतर पाडळशिंगी टोल नाक्यावरील पोलीसांना याची माहिती देऊन हे आयशर पडकण्यात आले. आयशर टेम्पो क्रमांक एमएच 14 जेएल 8631 यात तब्बल 31 लाख 18 हजार 500 रुपयाचा मुद्देमाल मिळून आला. चालक सोमनाथ जालिंदर मळेकर, वय 23 (रा. मळेकरवाडी, ता. पाटोदा), ज्ञानेश्वर भिमराव साळूंके रा.निगडी पुणे, महारुद्र मुळे रा. घोडका राजूरी ता. या तिघांवर बीड ग्रामिण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलीस अधिक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयपीएस पंकज कुमावत यांच्या पथकाने केली.
जिल्ह्यात गुटख्याचा धंदा करणारे इतर चौघे मोकाटच
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुटख्याचा धंदा करणारे अनेक जण आहेत. यात मुळे यांचा गुटखा आज पकडण्यात आलेले आहे. यासह इतर चौघे जण जिल्ह्यात दादागिरीच्या नावाखाली गुटखाचा धंदा करुन असून पोलीस खाकी दाखविण्याची गरज आहे. परंतू यांच्यावर राजकीय वरदहस्त असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचे बोलले जात आहे.
आयपीएस पंकज कुमावत यांना जे जमते, ते स्थानिक पोलीसांना का जमत नाही?
जिल्ह्यात सुरु असलेल्या गुटखा विक्रीवर सर्वात जास्त कारवाया पंकज कुमावत यांच्या पथकाने केलेल्या आहेत. विशेष म्हणजे ह्या कारवाया जिल्हाभरात झालेल्या आहेत. जे काम पंकज कुमावत यांना जमते तेच काम स्थानिक पोलीस का करु शकत नाहीत याचे कोडे मात्र सर्वसामान्यांना नेहमीच पडलेले असते. यामुळे या गंभीर प्रश्नांकडे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी याबाबत विशेष सुचना करण्याची गरज आहे.
पोलीस अधीक्षक साहेब, 31 लाखाचा गुटखा मग एक पोलीस कर्मचारी कारवाईसाठी कसा?
शनिवारी मध्यरात्री आयपीएस पंकज कुमावत यांच्या पथकाने 31 लाखाचा गुटखा जप्त केला. परंतू ह्या कारवाईत एकच पोलीस कर्मचारी दुचाकीवर संबंधित आयशरचा पाठलाग करत होता. एवढी मोठी कारवाई असताना एकच पोलीस कर्मचारी या कारवाईसाठी कशा? अशा प्रश्न उपस्थित होत आहे. एकच कर्मचारी याठिकाणी असल्यामुळे संबंधित आयशर चालकाने या कर्मचाऱ्याच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. जर यात काही अनर्थ घडला असता तर यामुळे पोलीस अधीक्षक साहेब यापुढे अशा घटना घडू नयेत यासाठी आपण विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे. गुटखा कारवाई साठी एकच कर्मचारी कसा गेला, कर्मचारी कारवाईसाठी गेला होता की वसूलीसाठी? या सर्व बाबींच्या अनुषंगाने संबंधित पोलीस कर्मचाऱ्याची चौकशी करण्यात आली तर सर्वच स्पष्ट होईल.