बीड तालुक्यात सर्वाधिक रुग्ण
बीड । प्रतिनिधी
बीड जिल्ह्यामध्ये वाढत असलेले रुग्ण थांबत नसून दिवसेंदिवस कोरोनाचा आकडा जिल्ह्यात वाढू लागला आहे. लॉकडाऊन केले असले तरीही कोरोना मात्र थांबताना दिसत नाही. आज जिल्हाभरात 375 नव्या रुग्णांची भर पडली. यात बीड तालुक्यात सर्वाधिक 112 रुग्ण आढळून आले.

आरोग्य विभागाकडून 2713 अहवालाचा रिपोर्ट दुपारी प्राप्त झाला. यात 2378 रिपोर्ट निगेटिव्ह आले तर 375 रिपोर्ट पॉझीटिव्ह आले. यात बीड-112, अंबाजोगाई-75, आष्टी-30, धारूर-12, गेवराई-24, केज-27, माजलगाव-25, परळी-38, पाटोदा-23, वडवणी-5, शिरूर-4 असे रुग्ण आढळून आले. जिल्ह्यात कोरोना आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करत असले तरी नागरिक नियमांचे पालन करत नसल्यामुळे कोरोना वाढताना दिसत आहे.
जिल्हा | शहर | तालुका | रुग्ण |
बीड | 112 |
अंबाजोगाई | 75 |
आष्टी | 30 |
धारूर | 12 |
गेवराई | 24 |
केज | 27 |
माजलगाव | 25 |
परळी | 38 |
पाटोदा | 23 |
वडवणी | 5 |
शिरूर | 4 |
एकूण | 375 |