गेवराईत संत भाऊ- बाबांच्या भव्य कीर्तन महोत्सवात निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचे प्रतिपादन
गेवराई : कोरोना काळात खूप माणसं गेली परंतू आपली पुण्याई चांगली म्हणून आपण तीनही लाटेत सुखरुप आहोत. देवाचे उपकार आहेत आपल्यावर त्यामुळे पैसा असून चालत नाही पैसे, सत्ता, संपत्ती कामी येत नाही परंतु आपल्या लेकरांवर संस्कार चांगले ठेवा. देव दयाळू आहे देवाचे नामस्मरण करा जीवनात काहीही वाईट होणार नाही असे प्रतिपादन समाज प्रबोधनकार ह.भ.प.निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी व्यक्त केले.
गेवराई येथे संत भाऊ-बाबा सेवा प्रतिष्ठान, गेवराई यांच्या वतीने संत भगवानबाबा व संत वामनभाऊ यांच्या पुण्यतिथीनिमित्त नाईक नगर येथे सुरु असलेल्या भव्य कीर्तन महोत्सवात शनिवार दि.१४ जानेवारी रोजी समाज प्रबोधनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचे सायं ५ ते ७ या वेळेत कीर्तन झाले यावेळी ते बोलत होते. यावेळी माऊली संस्थानचे ह.भ.प.नामदेव महाराज शेकटेकर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.संजय तांदळे, सचिव तथा जेष्ठ पत्रकार शिवाजी मामा ढाकणे, मोटे नाना, शेंडेकर अण्णा, गोपीनाथ घुले, अँड. प्रताप खेडकर, भास्कर ढाकणे, शिवसेनेचे शिनुभाऊ बेदरे, विष्णुपंत पानखडे राजेश राठोड अण्णासाहेब राठोड, किरण राठोड, पंकज ढाकणे, राजेंद्र भंडारी,डॉ.सुभाष ढाकणे, पत्रकार संघाचे अध्यक्ष मधुकर तौर, रामदास मुंडे, व्हॉईस ऑफ मीडियाचे तालुकाध्यक्ष विनोद पौळ, पत्रकार सुनील मुंडे, विनायक उबाळे, सुशील टकले, तुकाराम धस,गणेश भुकेले, किशोर जवकर, फुलशंकर अप्पा, बापुराव घुले, जीवनराव वराट सह आदी उपस्थित होते.
संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या कृपाळू सज्जन तुम्ही संतजन । हें चि कृपादान तुमचें मज ॥१॥
आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा । कींव माझी सांगा काकुलती ॥ध्रु.॥
अनाथ अपराधी पतिताआगळा । परि पायांवेगळा नका करूं ॥२॥
तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरि । मग मज हरि उपेक्षीना ॥३॥ या अभंगावर चिंतन केले. देव मिळवायचा असेल तर संताशिवाय पर्याय नाही. समाजाच्या हितासाठी सतत भजन, कीर्तन करुन ब्रम्हरुप होवून देव झाले त्यांना संत भाऊ-बाबा असे म्हणतात त्यांचे वैराग्याने शरिर पुर्ण झाले म्हणून हा संत भाऊ-बाबांच्या पुण्यतिथीचा हा भव्य सोहळा गेल्या १८ वर्षांपासून येथे होतो आहे.भागवत धर्माचे हेच खरे काम आहे. त्यामुळे देवाचे भजन करुन पुण्य कमवा. काटे सहन करायला शिका सिध्द व्हाल अहंकार करु नका. लोकांना तीन गोष्टी लागतात स्वार्थ, पैसा आणि मान तर वाझ झाडांचे नाव संसार आहे म्हणून संसारात अडकून न राहता भक्ति भावाने ज्ञान मंडपात येवून स्थिर व्हावे तसेच शास्त्र सोडून वागणारे लोक सुखी राहू शकत नाहीत.तसेच शरिराला जपा, आपल्यामुळे सर्व आहे. याचा विचार करा शरिर सांभाळा शरिर हिच खरी संपती आहे. पोरांनो नवीन जमीन घेवू नका परंतु बापाची जमीन मात्र विकू नका. शुध्द शाकाहार घ्या अन् घरचं खा. सध्या अपघाताचे प्रमाण वाढले कारण दारु पिऊन गाडी चालवणाऱ्याचे प्रमाण वाढले आहे. तरुणांमध्ये व्यसनाधीनता वाढत चालली आहे. १८ ते २२ वर्षाचे पोरं दारु पिवून अपघातात जातात हे दुर्देव आहे. पाठीमागे कुटुंबाचे खूप हाल होतात. म्हणून तरुणांनो दारु पिवून आयुष्य बरबाद करण्यापेक्षा अभ्यास तसेच उद्योग, व्यवसाय करुन आपल्या आई वडिलांचे स्वप्न साकार करा असा मौलिक सल्लाही त्यांनी शेवटी बोलताना दिला.यावेळी त्यांना हार्मोनियमवादक मोटे नाना, पखवाजावर दत्ताभाऊ सटले, आणि गायनाचार्य म्हणून रामनाथ सालपे महाराज, इंद्रजित महाराज येवले, नाना महाराज कवडे सह ह.भ.प.उमेश महाराज चव्हाण यांच्या यमाईदेवी वारकरी शिक्षण संस्थेतील बालवारकरी यांची साथ लाभली. तर कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचालन अर्जुन बारगजे यांनी केले. यावेळी महिलांसह पुरुष भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
@ चौकट –
*संत भाऊ – बाबा सेवा प्रतिष्ठानच्या धार्मिक कार्याचे ह.भ.प.इंदोरीकर महाराजांकडून कौतुक*
गेवराई येथे संत भाऊ-बाबांच्या पुण्यतिथीनिमित्त संत भाऊ-बाबा सेवा प्रतिष्ठानच्या वतीने हा भव्य सोहळा गेल्या १८ वर्षांपासून होतो आहे. हेच भागवत धर्माचा प्रचार व प्रसार करण्याचे खरे काम आहे. देव मिळवायचा असेल तर संताशिवाय पर्याय नाही. समाजाच्या हितासाठी सतत भजन, कीर्तन करुन ब्रम्हरुप होवून देव झाले त्यांना संत भाऊ-बाबा असे म्हणतात त्यांचे वैराग्याने शरिर पुर्ण झाले म्हणून हा संत भाऊ-बाबांच्या पुण्यतिथीचा हा भव्य सोहळा गेल्या १८ वर्षांपासून येथे होतो आहे. संत भाऊ-बाबा सेवा प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे कौतुक करुन प्रत्येकाने देवाचे भजन करुन पुण्य कमवा असा मौलिक सल्लाही शेवटी ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी दिला