आष्टी – तालुक्यातील प्रतिष्ठेची समजली जाणारी ग्रामपंचायत निवडणूक म्हणून गहुखेल ग्रामपंचायतीकडे पाहिले जात होते.पण याच निवडणूकीत सर्व सामान्य मतदाराच्या मनातील उमेदवार रिंगणात उभा असल्याने व आ.सुरेश धस याच्या मार्गदर्शनाखाली टाकलेल्या श्री.कमळेश्वर ग्रामपरिवर्तन पॅनलचे सर्व सदस्य निवडून येत सरपंचपदी सौ.प्रतिभाताई मल्हारी शिंदे या विराजमान झाल्या आहेत.
आष्टी तालुक्यातील गहुखेल ग्रामपंचायत निवडणूकीत आ.सुरेश आण्णा धस याच्या मार्गदर्शनाखाली श्री.कळमेश्वर ग्रामपरिवर्तन ने ९ सदस्य व १० व्या सरपंच पदाच्या उमेदवार असा पॅनल उभा करत निवडणूक चुरशीची असताना लोकांचा विश्वास संपादन करत गावाचा चेहरा मोहरा बदलणारा जाहिरनामा हाती घेऊन प्रतिष्ठेची मानली जाणारी ग्रामपंचायत आ.सुरेश आण्णा धस याच्या मार्गदर्शनाखाली ताब्यात घेऊन सर्व १० सदस्य निवडून आले.त्याच बरोबर सरपंच पदाच्या महिला उमेदवार सौ.प्रतिभाताई मल्हारी शिंदे या ४५० च्या मताधिक्याने भरघोस मतांनी निवडून आल्या आहेत. निवडून आलेल्या सरपंच, सदस्य व बहाद्दर मतदारांचे पॅनलच्या माध्यमातून आभार मानण्यात आले.
सदस्य म्हणून यामध्ये दादासाहेब आश्रुबा शेकडे, मुमताज राजू शेख, भारत महादेव म्हस्के, नीलम संपत वामन, विठाबाई सोपान आहेरकर, शिवाजी भाऊसाहेब कांबळे, सचिन आजिनाथ शेकडे, शारदा माणिक मोरे, वर्षा वैभव म्हस्के हे सदस्य निवडून आले आहेत यांना पॅनल मधील आमदार सुरेश धस यांचे स्वीय सहाय्यक सुभाष जगताप,भीमराव शेकडे, नंदू पाटील म्हस्के, दगडू कारभारी वामन, दीपक वामन, काकासाहेब वामन, रामा काकडे, तुकाराम लांडगे, पोपट म्हस्के, नारायण म्हस्के, बाळासाहेब पवळे, अशोक काकडे नाना, संतोष आहेरकर, वसंत आहेरकर, सुनील काकडे,अशोक शेकडे,कल्याण शेकडे, अंकुश शेकडे,पोपट शेकडे,भाऊसाहेब कांबळे, अंबादास शेकडे, अशोक वामन, दादा वामन यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक लढविण्यात आली होती. हा हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीचा विजय समजला जात आहे. सर्वसामान्य मतदारांनी, तरुणांनी,महिला भगिनींनी, ही निवडणूक हातात घेतली होती. या अगोदर असे वातावरण कधीही झाले नव्हते. गेल्या अनेक वर्षांची सत्ता सामान्य मतदारांनी उलथून टाकली.सर्व गावकरी प्रतिष्ठित व्यक्ती यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे.