बीड/प्रतिनिधी : बीडच्या आध्यात्मिक, संस्कार आणि संस्कृतीचा वारसा जोपसण्याचं काम संत जनीजनार्धन संस्थान करत आहे,आध्यात्म आणि मनःशांतीचे ठिकाण म्हणजे पाटांगणकर महाराजांचा मठ आहे,असे प्रतिपादन डॉ.दीपा क्षीरसागर यांनी केले,त्या श्रीमदजनीजनार्धन संस्थान थोरले पाटांगण बीड, प्रतिवार्षिक उत्सव निमित्त आयोजित श्रीमद भगवतगीता परीक्षा आणि विद्वन्मनी पुरस्कार समारंभ प्रसंगी बोलत होत्या.
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ.दीपा क्षीरसागर, संस्कृत भारतीचे प्रांताध्यक्ष डॉ.पी.के.कुलकर्णी,डॉ. रोहिणी वैद्य,बलभीम महाविद्यालयाचे माजी उपप्राचार्य डॉ.विद्यासागर पाटांगणकर तर कार्यक्रमाचे अध्यक्ष ऍड.कालिदास थिगळे,विनायक महाराज पाटांगणकर,नीलिमा ताई पाटांगणकर,स्वा.सावरकर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.लक्ष्मीकांत बाहेगाव्हाणकर हे होते,यावेळी वेदांत विद्यावाचस्पती डॉ. दिनेश रसाळ यांना विद्वन्मनी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी पुढे बोलताना डॉ. दीपा क्षीरसागर म्हणाल्या कि, 421 वर्षांपासून होणारा हा उत्सव बीडचा आध्यात्मिक वारसा जपतो आहे,आणि त्याच बरोबर स्व. धुंडीराजशास्त्री पाटांगणकर यांच्या प्रथम स्मृती प्रित्यर्थ विद्वन्मनी पुरस्कार हा संस्कृत भाषेतील कार्यासाठी दिला जाणारा पुरस्कार आहे, हा पुरस्कार ज्यांना मिळतोय ते वेदांतविद्यावाचस्पती डॉ. दिनेश रसाळ यांना विद्वन्मनी पुरस्कार देऊन बीडच्या वैभवात भर पडत आहे, रसाळ हे प्रसारमाध्यमातून तरुण पिढीपर्यंत ज्ञान पोहीचवण्याचं काम करत आहेत, तेजानी तेजाची आरती करावी असे व्यक्तिमत्व म्हणजे दिनेशजी रसाळ होय असे प्रतिपादन डॉ.दीपा क्षीरसागर यांनी केले.
यावेळी बोलताना वेदांतविद्यावाचस्पती डॉ. दिनेश रसाळ म्हणाले कि, समाजाला देवाशी जोडण्याचं कार्य संत करतात,गितेच्या माध्यमातून शोक आणि मोहाचा निचरा होतो, बुद्धिमत्तासाठी बारावा आणि पंधरावा अध्याय मुलांनी वाचावा असेही त्यानी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाची सुरुवात स्व. धुंडीराजशास्त्री पाटांगणकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली.यावेळी संपन्न होणाऱ्या भगवत गीताच्या स्पर्धामध्ये शंभर पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऍड.भालचंद्र पाटांगणकर यांनी केले तर परीक्षक म्हणून वेदमूर्ती किरण गोसावी यांनी काम पहिले.यावेळी भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते