—जलजीवन, शिवभोजन योजनेवर विशेष चर्चा
—जलजीवन कामावर बारीक लक्ष देण्याची गरज
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : जिल्ह्यात जलजीवन मिशन मध्ये झालेल्या गैरप्रकारानंतर पालकमंञी अतुल सावे यांनी विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. आज (ता. ०७) जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंञी अतुल सावे यांनी विशेष आढावा बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत शिवभोजन व जलजीवन मिशन योजनेवर विशेष चर्चा करण्यात आली. पालकमंञी अतुल सावे यांनी जलजीवन मिशन साठी आलेला निधी योग्य ठिकाणी खर्च करावा यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.
जलजीवन मिशनसाठी जिल्ह्यात मोठा निधी आला असून तो निधी योग्य ठिकाणी खर्च होण्याची गरज आहे. मध्यंतरी जलजीवन मिशन मध्ये मोठा गोंधळ झाल्यानंतर प्रशासन जागे झाले होते. संबंधित अधिकार्यांनी जवळच्यांना कामे दिल्यानंतर पुर्वीची टेंडर बंद करण्यात आले होते. आता हि टेंडर प्रक्रिया परत होणार असून आलेला निधी योग्य ठिकाणी खर्च होण्याची गरज आहे. याच अनूषंगाने आज जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंञी यांनी विशेष आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला आ. सुरेश धस, आ. लक्ष्मण पवार, जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, मुख्यकार्यकारी अधिकारी अजित पवार, पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकुर यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.