प्रारंभ वृत्तसेवा
बीड : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतिने दक्षता जनजागृती सप्ताह ३१ आॅक्टोंबर ते सहा नोव्हेंबर या कालावधी जिल्ह्यात राबवण्यात आला. आज (ता. ०६) या उपक्रमाचा समारोप कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. यावेळी बोलताना डिवायएसपी शंकर शिंदे म्हणाले की, बीड जिल्ह्यातील भ्रष्टाचार रोखण्यासाठी आपल्या सर्वांच्या पुढाकारी गरज आहे. तक्रारदार हा आमच्यासाठी देव असल्याचे मत सुद्धा त्यांनी यावेळी व्यक्त केले. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून श्री वराट, श्री साखरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
बीड जिल्ह्यात ३१ आॅक्टोबर ते सहा नोव्हेंबर या कालावधीत एसीबीच्या वतिने दक्षता जनजागृती सप्ताह राबवण्यात आला. या सात दिवसात जिल्ह्यात ठिक_ठिकाणी नागरिकांना योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले. लाच घेणे व देणे हा गुन्हा असून शासकिय कामात कोणी पैसाची मागणी करत असले तर नागरिकांनी एसीबी विभागाशी संपर्क करण्याची गरज आहे. दशता जनजागृती सप्ताहचा समारोप येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या बीड येथील कार्यालयात संपन्न झाला. यावेळी बीड उपाधीक्षक शंकर शिंदे, भागवत वराट, साखरे, पोलीस निरीक्षक अमोल धस, रविंद्र परदेशी आदींची उपस्थिती होती. यावेळी डिवायएसपी शंकर शिंदे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. बोलताना ते यावेळी म्हणाले की, आमच्याकडे कोणी तक्रार केली तर आम्ही तो विषय शेवट पर्यंत नेण्यासाठी पुढाकार घेतोत परंतु यात अनेक तक्रारदार शेवट पर्यंत ठाम राहत नाहीत, यामुळे अनेक दोषी निर्दोष सुटतात. यामुळे दोषीला शिक्षा देण्यासाठी तक्राररादाची भुमिका महत्वाची असल्याचे मत शंकर शिंदे यांनी व्यक्त केले. हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोह. सुरेश सांगळे, श्रीराम गिराम, भारत गारदे, हनुमंत गोरे, अविनाश गवळी, राजेश नेहरकर, अमोल खरसाडे, श्री राठोड, श्री निकाळजे, श्री कोरडे, श्री खेत्रे, श्री म्हेत्रे परिश्रम घेतले.