बीड प्रतिनिधी : मौजे बेलखंडी पाटोदा येथील अस्तित्व अनिल माने पाटील या बालकाच्या जागरुक भुमिकेमुळे बेलखंडी येथील डोंगराला लागलेली आग विझण्यात आली. गेल्या काही दिवसांपुर्वी बेलखंडी येथील डोंगराला आग लागली होती. ही आग सामाजिक कार्यकर्ते व बेलखंडी कदमवाडी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन अनिल माने पाटील यांच्या ११ वर्षाच्या मुलाने बघितली. तेव्हा या आगीमुळे जंगलातील झाडे जळतील. पशु पक्षी मरतील, असे त्याला वाटले.
तात्काळ त्यांने स्वतःच्या वडिलांना फोन करून डोंगराला आग लागल्याचे सांगितले. ही गोष्ट अनिल माने पाटील यांना समजताच त्यांनी तातडीने वनविभागाच्या अधिकाऱ्यांना ही गोष्ट कळवली. आणि डोंगराला लागलेली आग अधिकारी व ग्रामस्थांनी विझवली. त्यामुळे जळणारा डोंगर विझला गेला.
त्याच्या चांगल्या कामाचे कौतुक आज “बांबु दिनानिमित्त” वनविभागाच्या वतीने सत्कार करुन करण्यात आले. याप्रसंगी या सत्काराच्या वेळी वनविभागाचे तालुका अधिकारी श्री काकडे, जगताप, शिंदे व त्यांचे इतर सहकारी अधिकारी उपस्थित होते. या त्याच्या चांगल्या कामाबद्दल अस्तित्व माने या अकरा वर्षांच्या मुलाचा गौरव करण्यात आला.
यासाठी या कार्यक्रमाला श्री. संत जगद्गुरू तुकाराम महाराज संस्थानचे महंत भक्तीदास महाराज शिंदे व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. अस्तित्व माने या लहान मुलाच्या जागरूक भुमिकेमुळे डोंगराला लागलेली आग आटोक्यात आणता आली. या मुलामुळे जंगलातील झाडे, पशु पक्षी यांचे प्राण वाचले. असे सत्कार समारंभा प्रसंगी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
अशा कर्तुत्ववान, जागरूक, कर्तव्यदक्ष मुलाला वनविभागाने लेखी प्रशस्तीपत्र करून सन्मानित करायला हवे. कारण त्याची आत्मीयता अजुन वाढेल व इतर मुलांनाही त्याचा आदर्श घेता येईल. दरम्यान, अस्तित्व माने याचे जण आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित देशमुख यांनी अभिनंदन केले आहे