-अनेक भागातील रस्ते बनले चिखलमय; पायी चालणाऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय
-नगर रोड व बार्शी रोडला कोणी वाली आहे का?
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : शहरातील नागरीकांना गेल्या अनेक वर्षापासून विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. नागरीकांना मुलभूत सुविधा देण्यात आज पर्यंत नगर पालिकेला यश आलेले नाही. आज सुद्धा अनेक भागातील रस्ते कच्चेच आहे. जे रस्ते आहेत त्या रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झालेले आहे. थोडा जरी पाऊस झाला तरी ते रस्ते चिखलमय होत आहे. यामुळे ये-जा करणाऱ्या नागरीकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. भरपावसाळ्यात नागरीकांना दहा ते पंधरा दिवसाला पाणी पुरवठा करण्यात येत आहे. यासह नाल्यांची वेळेवर साफ-सफाई करण्यात येत नाही. यामुळे नागरीकांना विविध आजारांचा सामना सुद्धा करावा लागत आहे. यासह इतर समस्यांमुळे बीडकर हैराण झाले आहे. नगर पालिकेवर प्रशासन म्हणून उपजिल्हाधिकारी नामदेव टिळेकर असून ते नेमके काय करत आहेत हा प्रश्न उपस्थित होत आहे. यासह नगर रोड व बार्शी रोडवर किती बळी गेल्यानंतर या रस्त्यांचे काम करणार आहात अशा प्रश्न सुद्धा उपस्थित होत आहे. नागरीकांची गैरसोय करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही असेच चित्र निर्माण झाले आहे.
बीड शहरातील मोंढा रोड, मोंढा परिसर, पेठ बीड, बार्शी रोड, धानोरा रोड, अंकुश नगर, पालवण रोड, बार्शी नाका यासह इतर भागातील रस्ते प्रचंड प्रमाणात खराब झाले असून मोठ मोठे खड्डे पडले आहे. पावसाचे पाणी साचल्यानंतर वाहनधारकांना खड्ड्यांचा अंदाज येत नसल्यामुळे अनेक अपघात होत आहे. या भागातील रस्ते चिखलमय बनल्यामुळे पायी जाणाऱ्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. वारंवार तक्रारी करुन सुद्धा याबाबींकडे दुर्लक्ष होत आहे. यासह बीडला पाणी पुरवठा करणाऱ्या दोन्हीही तलावात पाणी साठा असून सुद्धा नागरीकांना पाण्यासाठी दहा ते पंधरा दिवस वाट पाहावी लागत आहे. यासह शहरातील अनेक भागातील नाल्या वेळेवर साफ न केल्यामुळे नागरीकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. सर्वत्र दुर्गंधी पसरत असल्यामुळे रोगराईचे प्रमाण सुद्धा शहरात वाढले आहे. बीड नगर पालिका मुळात बीडकरांना मुलभूत सुविधा देण्यातच अपयशी ठरलेली आहे. यासह बांधकाम विभागाकडे येणाऱ्या रस्त्यांची सुद्धा दुरावस्था झालेली आहे. यात नगर रोड, बार्शी रोडवर तर वाहने चालवणे कठीण बनले आहे. यामुळे बीड जिल्ह्यात नेमके चालेलय तरी काय अशा सुद्धा प्रश्न उपस्थित होत आहे.