केज प्रतिनिधी : केज शहरातील महात्मा फुलेनगर येथे श्री.आदर्श बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व सम्यक क्रांती सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने सम्यक क्रांती सार्वजनिक वाचनालयामध्ये शिक्षक दिन साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केज नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सौ.सिताताई बनसोड तर प्रमुख पाहुणे नगरसेविका सौ.पद्मिनी अक्का शिंदे,सेवानिवृत्त शिक्षक लक्ष्मण जोगदंड,सेवानिवृत्त प्राध्यापक श्री.प्रदीप बनसोड, सेवानिवृत्त शिक्षक श्री.आत्माराम खरात यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले,सावित्रीबाई फुले आणी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून धुप दीपानी पूजा करण्यात आली.
सम्यक क्रांती सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष तात्या लहू गवळी व सचिव सौ.मीरा तात्या गवळी यांनी मान्यवरांचा शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.
केज नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सौ.सीताताई बनसोड यांनी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणी सावित्रीबाई फुले यांचे विचार उपस्थितांना सांगून मार्गदर्शन केले. पुढे बोलताना नगराध्यक्षा सौ. सीताताई बनसोड म्हणाल्या की,महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी शिक्षणाची पहिल्यांदा सुरुवात केली.महात्मा ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाई फुले यांना पहिल्या महिला शिक्षिका केल्या.म्हणून तर आज महिलांना शिक्षणाची संधी मिळाली आहे. जर सावित्रीबाई फुले पहिल्या महिला शिक्षिका झाल्या नसत्या तर महिलांना आजही शिक्षणापासून वंचित राहावे लागले असते.आज ज्या महिला डॉक्टर, इंजिनीयर, कलेक्टर यासारख्या मोठमोठ्या पदावर कार्यरत आहेत.ते फक्त आणी फक्त महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच आम्ही सर्व महिला आज सन्मानाने जगतआहोत.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सम्यक क्रांती सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष तात्या गवळी यांनी केले. आपल्या प्रास्ताविक पर भाषणामध्ये तात्या गवळी म्हटले की,भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणी सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणासाठी मोठा संघर्ष केला.महात्मा फुले यांनी मुलीसाठी पहिली शाळा स्थापन करून महिलांना शिक्षणाचे दरवाजे उघडून दिले आहेत.क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले,डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे शिक्षणाचे आपले गुरु आहेत.या कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते अशोक गायकवाड,पप्पू दुनघव,संघर्ष पत्रकार संघाचे उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील,दत्ताञय हंडीबाग, शेख नौशाद,अर्जुन नाना राऊत,विनोद इनकर, राहुल इनकर,आदित्य बचुटे,किरण कांबळे, अजित शिरसट,अभिजीत शिरसट,पृथ्वीराज जावळे, यश शिरसट,ओम शिनगारे,अमर भैया, संदेश ताकतोडे आणी सम्यक क्रांती सार्वजनिक वाचनालयाचे सभासद, वाचक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्र संचालन राहुल इनकर यांनी केले तर सर्व उपस्थितांचे आभार सम्यक क्रांती सार्वजनिक वाचनालयाच्या सचिव सौ. मीरा गवळी मानले.