बीड जिल्ह्याला अध्यात्मिक बहुमान मिळाला- राजेंद्र मस्के
बीड प्रतिनिधी :यंदाच्या आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेत सहभागी होण्याचा मान गेवराई तालुक्यातील रुई येथील श्री मुरली भगवान नवले आणि सौ जिजाबाई मुरली नवले या दाम्पत्यांला मिळाला. नवले दाम्पत्य गेली अनेक वर्षापासून भक्ती भावाने पंढरपूरची पायी वारी करतात.शेतकरी असलेले नवले दाम्पत्य यावर्षी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्या सोबत पायी गेले होते. यावर्षी त्यांना मानाचे वारकरी म्हणून शासकीय पूजेत नवनिर्वाचित मुख्यमंत्री मा. एकनाथराव शिंदे यांच्या समवेत सहभागी झाले. याचा आनंद जिल्ह्यातील शेतकरी बांधव व वारकरी संप्रदायात झाला. खऱ्या अर्थाने नवले दाम्पत्यांच्या भक्तीमुळे बीड जिल्ह्याला अध्यात्मिक बहुमान मिळाला आहे. असे गौरवोद्गार भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी व्यक्त केले.
आज भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या राशी निवास्थानी श्रीविठ्ठल पुजेचे मानाचे वारकरी नवले दाम्पत्यांना साडी चोळी, मानाचे वस्त्रे व श्रीविठ्ठल रुक्मिणी मूर्ती भेट देऊन यथोचित सत्कार व सन्मान मस्के कुटुंबियांच्या वतीने करण्यात आला. याप्रसंगी सर्जेराव तांदळे, विक्रांत हजारी, भगीरथ बियाणी,शांतिनाथ डोरले, किरण बांगर, बालाजी पवार,सौ.जयश्री राजेंद्र मस्के, सौ.छाया मिसाळ,सौ.संगीता धसे, सौ.कांता बांगर, शितल राजपूत, लता बुंदेले, लता मस्के, प्रीत कुकडेजा,मनिषा येवले काकू, लता राऊत, सौ.गातताई, संभाजी सुर्वे, सरपंच वसंत गुंदेकर,शरद बडगे, तुकाराम कागदे, कल्याण पवार, बाबुराव कदम, बंडू मस्के, बाळासाहेब गात,सुरेश माने, प्रा.नवले, रामेश्वर लोखंडे,भीमा नवले,सचीन येवले,ओम नवले, दिलीप नवले, गणेश माने, रामेश्वर शिंदे बद्रीनाथ जटाळ, गणेश तोडेकर अनिल शेळके, हरिदास तकिक, आदी उपस्थित होते.