प्रारंभ न्युज
बीड : बीड नगर पालिकेत सीईओ म्हणून कार्यरत असणारे उत्कर्ष गुट्टे यांची अखेर उचलबांगडी करण्यात आली. त्यांच्या कार्यकाळात प्रंचड गैरकामे झाल्याच्या तक्रारी करण्यात आलेल्या आहेत. आ.विनायक मेटे यांनी लक्षवेधी मध्ये गट्टेंच्या कारभाराचा भांडाफोड केला होता. यासर्व बाबींच्या अनुषंगाने त्यांची उचलबांगडी करण्यात आलेली आहेत. त्यांच्या जागी यंग अधिकारी उमेश ढाकणे यांची नियुक्त करण्यात आलेली आहे. यापुर्वी त्यांनी गेवराई याठिकाणी काम केलेले आहे. बीड शहरात सुद्धा ते चांगले काम करतील अशी आशा त्यांच्याकडून आहे.
बीड नगर परिषदेचे सीईओ म्हणून गेल्या अनेक वर्षापासून उत्कर्ष गुट्टे हे काम पाहत होते. परंतु त्यांच्या कार्यकाळात प्रंचड प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त आहेत. यासह इतर बाबींत सुद्धा ते वादग्रस्त ठरलेले आहेत. आ.विनायक मेटे यांनी तर अधिवेशनात त्यांच्या कारभाराचा भांडाफोडच केला होता. याच अनुषंगाने आज त्यांची सीईओ पदावरुन उचलबांगडी करण्यात आली आहेत. त्यांच्या जागी गेवराई येथे नियुक्त असणारे उमेश ढाकणे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ढाकणे हे बीड शहरात चांगले काम करतील अशी अपेक्षा त्यांच्याकडून बीडकरांना आहे.
उत्कर्ष गुट्टे यांच्या संपत्तीची चौकशी कराच
बीड नगर पालिकेत गेल्या अनेक वर्षापासून सीईओ म्हणून उत्कर्ष गुट्टे यांनी काम पाहिलेले आहे. याच काळात त्यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याच्या तक्रारी आहेत. परंतु आज पर्यंत त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली नव्हती. आज त्यांची बदली जरी करण्यात आलेली असली तरी त्यांच्या संपुर्ण संपत्तीची चौकशी करण्यात यावी अशी मागणी होत आहे.