प्रारंभ वृत्तसेवा
बीड : नामलगाव देवस्थानाच्या 25 एकर जमिन प्रकरणी अजून सुद्धा मुख्यसुत्रधार यांच्यावर गुन्हे नोंद करण्यात आलेले नाहीत. या प्रकरणी मोरक्यांवर गुन्हे नोंद करण्यास संबंधित अधिकारी टाळाटाळ करत आहेत. यामुळेच नामलगाव देवस्थानच्या जमिन प्रकरणी मुख्य चोरटे मोकाटच आहेत. अधिकारी जर दोषींवर गुन्हे नोंद करत नसतील तर संबंधित अधिकाऱ्यांवरच गुन्हे नेोंद करण्याची मागणी होऊ लागली आहे.
बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात देवस्थानांची जमिन हडप केल्याचे प्रकार उघडकीस आली आहे. यात आष्टी तालुक्यात काही गुन्हे नोंद करण्यात आले आहेत यासह बीड तालुक्यातील सारंगपुर मस्जिदच्या 25 एकर जमिन प्रकरणी सुद्धा दोषींवर गुन्हे नोंद करण्यात आलेले आहेत. परंतु नामलगाव देवस्थानच्या 25 एकर जमिन प्रकरणी अजून सुद्धा मुख्य दोषींवर गुन्हे नोंद करण्यात आलेले नाहीत. या प्रकरणी मोठ्या नेत्यांचा दबाव संबंधित अधिकाऱ्यावर येत असल्याचे बोलले जात आहे. यामुळे संबंधित अधिकारी दोषींवर गुन्हे नोंद करत नाहीत. जर हे अधिकारी दोषींवर गुन्हे नोंद करत नसतील तर संबंधित अधिकाऱ्यावरच गुन्हे नोंद करावेत.
नामलगाव प्रकरणी मोठा नेता अधिकाऱ्यांवर दबाव टाकतोय
नामलगाव देवस्थानची 25 एकर जमिन मोठ्या लॉबीने मिळून हडप करण्याचा डाव टाकला हाता. परंतु हा प्रकार गावकऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर गावकऱ्यांनी हा डाव हाणून पाडला. या प्रकरणी छोट्या दोषींवर कारवाई करण्यात आली आहे. परंतु याप्रकरणातील मोठे मासे अजून सुद्धा मोकाटच आहेत. त्याचे कारण सुद्धा तसेच आहे. जिल्ह्यातील एक मोठा नेता यातील दोषींवर कारवाई करु नका असे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देत आहे. यामुळे आज पर्यंत संबंधित अधिकारी यांनी दोषींवर कारवाई केलीच नाही.