प्रारंभ वृत्तसेवा
बीड : मराठा आरक्षणासह इतर मागण्यांच्या अनुषंगाने येत्या 26 तारखेला छत्रपती संभाजीराजे हे मुंबईत उपोषणाला बसणार असून या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी मंगळवारी (ता. 22) शहरात मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीत या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी मोठ्या संख्येने मुंबईला जाण्याचा निर्णय घेण्यात आला. यासह सोमवारी (ता. 28) बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवशीय धरणे आंदोलन करण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आला. मुंबईत होणाऱ्या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक बी.बी.जाधव यांच्यासह इतर पदाधिकारी यांनी केले आहे.
गेल्या अनेक वर्षापासून मराठा समाज त्यांच्या विविध हक्काच्या मागण्यांसाठी लोकशाही मार्गाने लढा देत आहे. परंतु आज पर्यंत मराठा समाजाच्या मागण्यांकडे विशेष लक्ष देण्यात आलेले नाही. यामुळे मराठा समाजाच्या प्रलंबित प्रश्नांच्या अनुषंगाने छत्रपती संभाजी महाराज यांनी पुढाकार घेतला असून राजे मुंबई येथील आझाद मैदानावर येत्या 26 फेब्रुवारीपासून आमरण उपोषणास बसत असून त्यांना संपुर्ण राज्यातुन मोठा प्रतिसाद मिळत आहे. याच अनुषंगाने बीड शहरात सुद्धा मंगळवारी एक बैठक संपन्न झाली. या बैठकीत मुंबईत होणाऱ्या आंदोलनाना पाठींबा देण्यात आला. यामुळे बीडचे मावळे परत राजधानीत आंदोलनासाठी जाणार आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक बी.बी. जाधव यांच्यासह इतर मंडळीने केले आहे.