चर्हाटा फाटा परिसरातील व्हिआयपी पत्याच्या क्लबवर धाड
४० ते ५० व्हिआयपी आरोपींसह मोठा मुद्देमाप जप्त
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : शिवसेना जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे यांचे प्रकरण ताजे असतानाच आता भाजपाचे जिल्हा प्रमुख राजेंद्र मस्के हे मोठ्या अडचणीत सापडले आहे. काल राञी त्याचे मोठे बंधु यांच्या मालकीच्या जागेत सुरु असलेल्या व्हिआयपी पत्याच्या क्लबवर आयपीएस पंकज कुमावत यांच्या विशेष पथकाने धाड टाकली. यात तब्बल ४० ते ५० व्हिआयपी आरोपींसह मोठा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला आहे.
जिल्ह्यातील प्रमुख पक्षाचे नेतेच जर अवैद्य धंदे करत असतील तर इतरांचे का असा प्रश्न सध्या बीड जिल्ह्यातील नेत्यांच्या कारभारावरुन उपस्थित होत आहे. गुटखा प्रकरणी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे यांच्यावर गुन्हा नोंद होण्याचा प्रकार ताजा असतानाच, बीड जिल्ह्याचे भाजपा अध्यक्ष राजेंद्र मस्के हे अडचणीत सापडले आहेत.
त्याचे मोठे बंधु मदन तुकाराम मस्के यांच्या मालकीच्या जागेत गेल्या अनेक महिन्या पासून व्हिआयपी पत्याचा क्लब सुरु होता. याची माहिती आयपीएस पंकज कुमावत यांना मिळाली होती, यानंतर त्यांनी काल राञी उशिरा बीड तालुक्यातील चर्हाटा फाटा परिसरातील व्हिआयपी पत्याच्या क्लबवर धाड टाकली. राजेंद्र मस्के सह ५१ जणांवर बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आयपीएस पंकज कुमावत यांच्या कामावर जिल्ह्यातील सर्व सामान्य नागरिक माञ खुष आहेत…
यात माझा काहीच संबंध नाही — राजेंद्र मस्के
संबंधीत जागा ही माझ्या मालकीचे नाही, ती जागा माझे भाऊ यांच्या नावावर असून ती जागा त्यांनी भाडे तत्वावर दिली होती असे मत प्रारंभशी बोलताना भाजपा जिल्हाअध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी व्यक्त केले.