• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Tuesday, June 24, 2025
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result
Prarambh Live | Latest Marathi News Update
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
  • बीड जिल्हा
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Home ताज्या बातम्या

मराठा आरक्षण: मराठा समाजातील युवकांना दिलासा

संपादक | प्रारंभ टिम by संपादक | प्रारंभ टिम
July 13, 2021
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

प्रारंभ वृत्तसेवा


मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात एक महत्त्वाचा निर्णय शासनाने नुकताच जाहीर केला आहे. 14 नोव्हेंबर, 2014 पर्यंत ज्या उमेदवारांना ईएसबीसी प्रवर्गातून नियुक्त्या देण्यात आल्या असतील त्या कायम करण्याबाबतचा शासन निर्णय राज्य शासनाने जारी केला आहे.

ईएसबीसी प्रवर्गासाठी राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील जागांच्या प्रवेशाचे आणि राज्याच्या नियंत्रणाखालील लोकसेवांमधील नियुक्त्यांच्या किंवा पदांच्या आरक्षणाच्या आदेशाला मुंबई उच्च न्यायालनाने 14 नोव्हेंबर 2014 रोजी अंतरिम स्थगिती दिली होती. त्यानुसार उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अनुषंगाने या आरक्षणासंदर्भातल्या कार्यवाहीबाबत 21 फेब्रुवारी, 2015 रोजी शासन निर्णय जारी करण्यात आला होता. पुढे या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर होऊन आरक्षण अधिनियम, 2014 अस्तित्वात आला. या अधिनियमाविरोधातील दाखल रिट याचिकांवर उच्च न्यायालयाने 7 एप्रिल 2015 रोजीच्या आदेशानुसार या अधिनियमाला स्थगिती दिली होती.

तात्पुरत्या नियुक्त्या कायम होणार
न्यायालयाचे आदेश लक्षात घेता 21 फेब्रुवारी 2015 च्या आदेशात सुधारणा करून ईएसबीसी प्रवर्गाकरिता आरक्षणाबाबत 2 डिसेंबर, 2015 च्या शासन शुद्धिपत्रकान्वये सुधारित आदेश देण्यात आले होते. त्यानुसार शासकीय व निमशासकीय सेवेतील रिक्त पदांसाठी 14 नोव्हेंबर, 2014 पूर्वी ईबीसी प्रवर्गासाठी असलेल्या आरक्षणासह जाहिरात दिलेल्या प्रकरणात उच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय होईपर्यंत खुल्या प्रवर्गातील गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांमधून तात्पुरत्या स्वरूपात जास्तीत जास्त 11 महिन्यांच्या कालावधीसाठी किंवा या न्यायालयीन प्रकरणाचा अंतिम निर्णय, यापैकी जे अगोदर घडेल त्या कालावधीकरिता तात्पुरत्या स्वरूपात नेमणुका करण्याचा निर्णय राज्य शासनाने निर्णय घेतला होता. आता 5 जुलै 2021 च्या शासन निर्णयानुसार राज्य शासनाने या तात्पुरत्या स्वरुपातील नेमणुका कायम करण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा बोर्डासंदर्भात राज्य सरकारचा मोठा निर्णय, अजित पवारांनी केली विधानपरिषदेत घोषणा!

एसईबीसी उमेदवारांसाठी वयोमर्यादा मागासर्गीयांप्रमाणे ग्राह्य धरणार
सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाच्या (एसईबीसी) आरक्षणासंदर्भातील एसईबीसी कायदा, 2018 लागू झाल्यानंतर त्यासंदर्भातील दाखल सिव्हिल पिटीशनच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने 9 सप्टेंबर, 2020 रोजी या कायद्याला स्थगिती दिली होती. त्यामुळे यापूर्वी सुरू करण्यात आलेली आणि विविध टप्प्यांवर प्रलंबित असलेली भरती प्रक्रिया स्थगित झाली होती. या सिव्हिल पिटीशनच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने 5 मे, 2021 रोजी अंतिम निर्णय देऊन हा आरक्षण कायदा अवैध ठरवून एसईबीसी वर्गाचे आरक्षण रद्द केले. सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती देईपर्यंत म्हणजेच 9 सप्टेंबर, 2020 पर्यंत एसईबीसी आरक्षणासह सुरू केलेली आणि विविध टप्प्यांवर प्रलंबित असलेल्या भरतीप्रक्रिया पूर्ण करणे आणि या भरतीप्रक्रियेत समाविष्ट उमेदवारांना दिलासा देण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने निर्णय घेतला आहे. त्यानुसार एसईबीसी उमेदवारांचा अराखीव व इडब्ल्यूएस प्रवर्गात विचार करण्यात यावा; आणि असे करताना एसईबीसीच्या ज्या उमेदवारांनी अराखीव प्रवर्गाकरीता विहित करण्यात आलेली वयोमर्यादा ओलांडली असेल त्यांच्याबाबतीत जाहिरातीतील तरतुदीनुसार मागासवर्गीयांना देय असलेली वयोमर्यादा व परीक्षा शुल्काची सवलत कायम ठेवण्यात येईल, असे या निर्णयात राज्य शासनाने स्पष्ट केले आहे.

एसईबीसी उमेदवारांना ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र देण्याच्या कालावधीत दिलासा
तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे 9 सप्टेंबर, 2020 पर्यंत सुरु केलेल्या ज्या निवड प्रक्रिया प्रलंबित आहेत अथवा ज्या नियुक्त्या प्रलंबित असतील अशा प्रकरणामध्ये ईडब्ल्यूएस आरक्षण लागू असेल आणि एसईबीसी उमेदवारांनी ईडब्ल्यूएसचा विकल्प स्वीकारला असेल तसेच त्यासाठी ते पात्र असतील तर अशा उमेदवारांसाठीही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यानुसार अशा निवडप्रक्रियांमध्ये एसईबीसी उमेदवारांना ईडब्ल्यूएस आरक्षण अनुज्ञेय करताना, सन 2018-19 व सन 2019-20 मधील परीक्षांसाठी मार्च 2020 व सन 2020-21 मधील परीक्षांसाठी मार्च 2021 पर्यंत ग्राह्य असणारे ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र सादर करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

महिला उमेदवारांचे एसईबीसी आरक्षणांतर्गत प्राप्त नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र ग्राह्य धरणार
तसेच ज्या एसईबीसी महिला उमेदवार अराखीव (खुला) असा विकल्प देतील अशा महिला उमेदवारांनी संबंधित पदाची / परीक्षेची जाहिरात (दोन किंवा अधिक टप्प्यांची परीक्षा असल्यास पूर्व परीक्षेची) प्रसिद्ध झालेली आहे, त्या जाहिरातीनुसार एसईबीसी आरक्षणासाठी प्राप्त केलेले उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे (नॉन क्रिमिलेअर) प्रमाणपत्र हे अराखीव महिला पदासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे.

Tags: Maratha Arakshan




Previous Post

बीड जिल्ह्यात आज 175 नव्या रुग्णांची भर!

Next Post

5237 अहवालात 193 अहवाल पॉझिटिव्ह

संपादक | प्रारंभ टिम

संपादक | प्रारंभ टिम

ठळक बातम्या

माजी आ.प्रा.सुनील धांडे यांनी उचलला एकनाथ शिंदे यांचा धनुष्यबाण

माजी आ.प्रा.सुनील धांडे यांनी उचलला एकनाथ शिंदे यांचा धनुष्यबाण

June 17, 2025
खतांच्या स्टॉकची आकडेवारी समोर आणा, कृत्रिम टंचाई किंवा लिंकिंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा – धनंजय मुंडे यांच्या कृषी अधिकाऱ्यांना सूचना

खतांच्या स्टॉकची आकडेवारी समोर आणा, कृत्रिम टंचाई किंवा लिंकिंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा – धनंजय मुंडे यांच्या कृषी अधिकाऱ्यांना सूचना

June 16, 2025
बीडमध्ये उभारणार सहकार संकुल; १४ कोटी ९८ लाखांची प्रशासकीय मान्यता

बीडमध्ये उभारणार सहकार संकुल; १४ कोटी ९८ लाखांची प्रशासकीय मान्यता

June 6, 2025
तरुण मुलांचे लग्न करून देण्याच्या बहाण्याने पैसे लूट करणारी टोळी वडवणी पोलीसांनी केली गजाआड

तरुण मुलांचे लग्न करून देण्याच्या बहाण्याने पैसे लूट करणारी टोळी वडवणी पोलीसांनी केली गजाआड

June 5, 2025
गोपीनाथगडावरील कार्यक्रम प्रेरणा अन् उर्जेचा; मोठया संख्येने उपस्थित रहा – ना.पंकजाताई मुंडे

गोपीनाथगडावरील कार्यक्रम प्रेरणा अन् उर्जेचा; मोठया संख्येने उपस्थित रहा – ना.पंकजाताई मुंडे

June 2, 2025
१२ डिसेंबरला माजी पालकमंत्र्याच्या बंगल्यावर मुख्य आरोपी सोबत पोलीस अधिकाऱ्याची बैठक

दौंड-इंदोर एक्सप्रेसला अहिल्यादेवी होळकरांचे नाव द्या — खा. बजरंग सोनवणे

May 29, 2025
अहिल्यादेवी होळकर म्हणजे धैर्य, शौर्य व औदार्याचे मूर्तिमंत स्वरूप

अहिल्यादेवी होळकर म्हणजे धैर्य, शौर्य व औदार्याचे मूर्तिमंत स्वरूप

May 29, 2025
धनंजय मुंडेंच्या मागणीला मोठे यश; सोयाबीनच्या हेक्टरी उत्पादकतेत दुप्पटीपेक्षा अधिक वाढ

धनंजय मुंडे मनःशांतीसाठी नाशिकच्या इगतपुरी मधील विपश्यना केंद्रात

May 29, 2025
Beed : माजी आ. आर टी देशमुख यांचे अपघाती निधन

Beed : माजी आ. आर टी देशमुख यांचे अपघाती निधन

May 26, 2025
लिंबागणेश शिवारात पवनचक्की रखवालदाराने केलेल्या गोळीबार ; एकाचा मृत्यू

लिंबागणेश शिवारात पवनचक्की रखवालदाराने केलेल्या गोळीबार ; एकाचा मृत्यू

May 23, 2025
Next Post

5237 अहवालात 193 अहवाल पॉझिटिव्ह

सत्तेत असो वा नसो विकासाची कामे चालूच राहणार-माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर

सत्तेत असो वा नसो विकासाची कामे चालूच राहणार-माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर

ना. धनंजय मुंडे गोपीनाथगडावर नतमस्तक!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
माजी आ.प्रा.सुनील धांडे यांनी उचलला एकनाथ शिंदे यांचा धनुष्यबाण

माजी आ.प्रा.सुनील धांडे यांनी उचलला एकनाथ शिंदे यांचा धनुष्यबाण

June 17, 2025

खतांच्या स्टॉकची आकडेवारी समोर आणा, कृत्रिम टंचाई किंवा लिंकिंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा – धनंजय मुंडे यांच्या कृषी अधिकाऱ्यांना सूचना

बीडमध्ये उभारणार सहकार संकुल; १४ कोटी ९८ लाखांची प्रशासकीय मान्यता

तरुण मुलांचे लग्न करून देण्याच्या बहाण्याने पैसे लूट करणारी टोळी वडवणी पोलीसांनी केली गजाआड

गोपीनाथगडावरील कार्यक्रम प्रेरणा अन् उर्जेचा; मोठया संख्येने उपस्थित रहा – ना.पंकजाताई मुंडे

दौंड-इंदोर एक्सप्रेसला अहिल्यादेवी होळकरांचे नाव द्या — खा. बजरंग सोनवणे

तारखेनुसार बातमी शोधा !

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

वाचक संख्या


Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा