पुणे ( रामहरी केदार)
राज्य शासनाने कोरोना कालावधित अर्थिक मदत म्हणून घोषणा केल्याप्रमाणे असंघटित कामगारांना ५४७६ कोटी रुपयांच्या निधीचे वितरण सुरू झालेले असून तीन दिवसापासून रिक्षाचालकांना पंधराशे रुपये प्रमाणे त्यांच्या बँक खात्यामध्ये वितरण सुरुवात झाले याचे
कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे रिक्षाचालकांनी स्वागत केले कोरोनाचा कालावधी अजून वाढत असल्यामुळे पुन्हा रक्कम मध्ये वाढ करुन पुन्हा एकदा अनुदान देण्याची रिक्षाचालकाने मागणी केली
यावेळी राज्य सरचिटणीस नितीन पवार ,महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते, निमंत्रक राजू बोराडे ,संजय केसरकर, दत्ता सुरवसे, अश्रुबा सुरवसे ,नामदेव जाधव ,अतिश वडमारे, तुषार पालके रामा बिरादार आदी उपस्थित होते
कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व परिवहन मंत्री अनिल परब यांची भेट घेऊन मागणी केली होती
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ,कामगारमंत्री हसन मुश्रीफ , उपसभापती नीलम गो-हे यानी मदती साठी तात्काल कार्यवाही केली कष्टकरी संघर्ष महासंघ व रिक्षा पंचायतीच्या वतीने पिंपरी-चिंचवड शहरातील दहा ठिकाणी मोफत फॉर्म भरण्याची सुविधा केंद्र सुरू करण्यात आले होते याचा अनेक रिक्षाचालक यानी लाभ घेतला असून त्यानुसार परवानाधारक रिक्षाचालकांना जाहीर केलेल्या योजनेनुसार नऊ हजार तीनशे अर्ज प्राप्त झाले आहेत त्यापैकी सहा हजार अर्जांना मान्यता देण्यात आलेली आहे त्यानुसार लाभ सुरू झाले आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न केल्यानंतर अर्थसहाय्य त्वरित मिळत आहे रिक्षा चलकानी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले,