प्रभाग १३, १६ आणि २३ मध्ये कॉर्नर सभा
बीड प्रतिनिधी : नगरपरिषद निवडणुकीसाठी आम्ही उमेदवारी देतानाच लोकांसाठी कोण काम करेल हा सर्वप्रथम निकष ठेवून सर्वसामान्य घरातील उमेदवार दिले आहेत. त्यामुळे ते नागरिकांच्या कामांसाठी सदैव उपलब्ध राहतील असे सांगत आ. संदीप क्षीरसागर यांनी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार स्मिता विष्णू वाघमारे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आघाडीच्या सर्व उमेदवारांना तुतारी आणि मशाल चिन्हा समोरील बटन दाबून विजयी करण्याचे आवाहन केले.
नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने आ. संदीप क्षीरसागर यांचा प्रचाराचा झंझावात जोरात सुरू आहे. गुरुवारी (दि.२७) आ. क्षीरसागर यांचा प्रचाराचा झंझावात प्रभाग 13 चे उमेदवार मायादेवी ज्ञानोबा पारवेकर, वैभव उत्तरेश्वर चिरके यांच्या प्रचारार्थ हाउसिंग कॉलनी भागात तर प्रभाग 16 चे उमेदवार कुरेशी सबा नाझ एजाज अहेमद, शेख नसीम रफियोद्दीन यांच्या प्रचारार्थ विद्यानगर भागात कॉर्नर बैठक घेतली. तसेच प्रभाग 23 मध्ये खुर्शीद मिया मोमीन शाहमोहम्मद (खुर्शीद आलम) आणि शेख बानुबेगम महेमूद (हमीद पाले खान) यांच्या प्रचारार्थ मोमीनपुरा भागात कॉर्नर सभा घेतली. या कॉर्नर सभांना मतदारांचा प्रचंड असा प्रतिसाद मिळाला आहे. यावेळी बोलताना आ. संदीप क्षीरसागर म्हणाले की, माझ्या सामान्य बीडकरांना कोणतीही अडचण येऊ नये याला माझे प्राधान्य आहे. यासाठी सामान्य माणसाच्या अडचणी आणि दुःखाची जाण असणारी व्यक्ती पदावर असणे आवश्यक आहे. यामुळे नगरपरिषदेला उमेदवार देताना आम्ही सामान्य घरातील उमेदवार दिले आहेत. यामुळे ते शहरातील नागरिकांच्या कामांना कधीही आणि कुठेही उपलब्ध राहणारे आहेत. यामुळे या तुमच्या मदतीला धावून येणारे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार स्मिता विष्णू वाघमारे आणि शहरातील तुतारी व मशाल चिन्हावर निवडणूक लढवित असलेल्या आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा असे आवाहन आ. संदीप क्षीरसागर यांनी केले. यावेळी माजी आ. सय्यद सलीम, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, नगराध्यक्षपदाच्या उमेदवार स्मिता वाघमारे नगरसेवक पदाचे उमेदवार आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मतदारांची बैठकीला मोठी गर्दी होती.
















