अमरसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली गेवराईत कार्यकर्ते लागले प्रचाराला
गेवराई प्रतिनिधी ः- गेवराई शहाराच्या सर्वांगिन विकासासाठी भविष्यवादी नेतृत्वाची गरज आहे आणि ती क्षमता शिवछत्र परिवारात आहे. विकास कामासाठी सरकारकडून निधी मंजुर करून आणावा लागतो तशी जाण असावी लागते. माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली आ. विजयसिंह पंडित यांनी आपल्या आमदारकीच्या केवळ दहा महिन्यांत ३५ कोटी रुपयांचा निधी गेवराई शहरासाठी मंजुर करून आणला आणि जवळपास दहा कोटी रुपयांची विकास कामे सुरु देखील झाली आहेत, काही परिपूर्ण झालेली आहेत. यापुढील काळात गेवराई नगर परिषदेच्या माध्यमातून शहराचा चेहरा-मोहरा बदलायचा आहे, त्यासाठी नगर पालिकेची सत्ता आपल्या हातात असणे आवश्यक आहे आणि ती सत्ता मिळवण्यासाठी आपण मला आशिर्वाद द्या. घड्याळ या चिन्हासमोर मतदान करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करा असे आवाहन माजी नगराध्यक्ष महेश दाभाडे यांनी केले. मतदारांशी सुसंवाद साधताना ते बोलत होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ.शितलताई दाभाडे यांच्यासह सर्व प्रभागातील राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ महेश दाभाडे यांनी शहरातील विविध भागांचा दौरा करून मतदारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, शिवछत्र परिवाराने कधीही विकास कामांत दुजाभाव केला नाही. सत्ता असो की नसो कायम लोकसेवेच्या भुमिकेमध्ये माजी आमदार अमरसिंह पंडित, आ. विजयसिंह पंडित काम करत आहेत. आमदार झाल्यानंतर विजयसिंह पंडित यांनी दहा महिन्यांच्या कालावधीमध्ये कोट्यावधी रुपयांचा निधी गेवराई तालुक्यासाठी खेचून आणला. सिमेंट रस्ते, नाल्या, कब्रस्थान संरक्षण भिंत, स्मशानभुमी बांधकाम, सभागृहाचे बांधकाम असे विविध कामे पूर्ण देखील झाले आहेत. यापुढील काळात गेवराई शहरातील उर्वरित विकास कामांनाही सुरुवात केली जाईल. येणाऱ्या काळात गेवराई शहर स्मार्ट शहर म्हणून ओळखले जाईल. गेवराई शहराच्या उज्वल भविष्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ या चिन्हावर मतदान करून नगराध्यक्ष व सर्व नगरसेवक मोठ्या मताधिक्याने विजयी करा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
महेश दाभाडे यांनी गेवराई शहरातील विविध प्रभागांचा दौरा करून मतदारांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासमवेत उमेदवार कृष्णा मुळे, महेश मोटे, अशोक गायकवाड, जीवन दाभाडे, शिवनाथ परळकर, सचिन मोटे, राहुल मोटे, महादेव काशिद, बाळू दाभाडे, अनिल जवंजाळ, शुभम घुंबार्डे, विशाल दाभाडे, मंजुरभाई बागवान, अमोल पौळ, अमोल होंडे, माऊली पंडित यांच्यासह राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.