नगराध्यक्ष उमेदवारासह नगरसेवक पदासाठी 52 उमेदवार मैदानात
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून जिल्ह्यातील एकूण सहा नगरपालिकांची निवडणूक पार पडत आहेत. त्यात बीड नगरपालिकेच्या निवडणुकीकडे सर्वांचे विशेष लक्ष लागले आहे. यावेळेस बीड नगरपालिकेत चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे, या लढतीमध्ये नगरपालिका आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी बीड मतदार संघाचे आ. संदीप क्षीरसागर यांनी विशेष रणनीती आखली आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी, भाजपा, एमआयएम, वंचित बहुजन आघाडी हे पक्ष सुद्धा या निवडणुकीत जोमाने तयारीला लागले आहे. चौरंगी लढत असल्यामुळे आ. संदीप क्षीरसागर या निवडणुकीत विजय संपादन करण्यासाठी मायक्रोन नियोजन करताना दिसत आहेत. नगराध्यक्ष सह 52 उमेदवार या निवडणुकीत आ. संदीप क्षीरसागर यांनी उतरविले आहेत. बीड नगरपालिकेत चौरंगी लढत होत असल्यामुळे ही निवडणूक रंगतदार बनत आहे. या निवडणुकीमध्ये कोण विजय खेचून आणणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे















