सोशल मीडियावर अमृत सारडा यांच्या समर्थनार्थ अनेक पोस्ट व्हायरल
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : बीड नगरपालिकेची निवडणूक रंगतदार बनत असून काल (ता. 17) शहरातील 26 प्रभागांमध्ये एकूण 52 नगरसेवकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. एकूण 52 जागेसाठी 774 जणांनी त्यांचे उमेदवारी अर्ज दाखल केले होते. आज (ता. 18) या उमेदवारी अर्जाची छाननी सुरू असून मोठ्या संख्येने अर्ज आल्यामुळे सध्या सुद्धा छाननी सुरूच आहे. यात आज बीड शहरातील प्रभाग तीन मधील भाजपाचे उमेदवार अमृत सारडा यांच्या अर्जावर विरोधकांनी आक्षेप घेतला होता, परंतु निवडणूक आयोगाकडून सारडा यांचा उमेदवारी अर्ज वैद्य करण्यात आला आहे. अर्ज वैद्य करतात सोशल मीडियावर विरोधकांचा डाव फसला, आता विजयाचा गुलाल आम्हीच उधळणार, अशा पोस्ट व्हायरल होऊ लागल्या आहेत. अमृत सारडा यांना शुभेच्छा सुद्धा देणाऱ्या पोस्ट व्हायरल झाल्या आहेत.
















