बीड प्रतिनिधी │ गेवराई राजकारणात मोठा भूकंप घडवणारी घटना घडली आहे. गेवराई नगरपरिषदेतील भाजपचे जेष्ठ व अनुभवी नगरसेवक जानमोहमंद बागवान यांनी आज बीड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार पक्षा मध्ये औपचारिक प्रवेश केला. या प्रवेशामुळे भाजपला मोठा धक्का बसल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
बीड येथे झालेल्या या कार्यक्रमाला आमदार संदीप क्षीरसागर, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, माजी आ.सय्यद सलीम, राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, प्रवक्ते शिवराज बांगर युवा नेते राजेंद्र मोटे, तसेच तालुकाध्यक्ष आण्णासाहेब राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती. या सर्वांच्या हस्ते जानमोहमंद बागवान यांचा पक्षात जाहीर स्वागत सोहळा पार पडला.
या प्रसंगी बोलताना जानमोहमंद बागवान म्हणाले, सामान्य कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष होत आहे. आम्ही जनतेसाठी राजकारण करतो, खुर्चीसाठी नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा विचारांचा आणि सर्वसमावेशकतेचा पक्ष आहे. शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली जनतेच्या प्रश्नांसाठी लढण्याचा निर्धार केला आहे.”
याच कार्यक्रमात जुनेद बागवान,सय्यद एजाज ,अमजद पठाण ,सोहेल बागवान, अतीक बागवान, शेख शहानवाज, अभिजीत सोनवने,शेख राजू,जुबेर बागवान ,अजय राऊत,परवेज बागवान, आवेज बागवान,जुबेर बागवान,साहिल बागवान,शहानवाज बागवान,हब्बू भाई, गुड्डू भाई ,अरबाज भाई यांच्या सह अनेकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. युवकांमध्ये त्यांचा वाढता प्रभाव पाहता हा प्रवेश पक्षासाठी बळकटी देणारा ठरणार आहे, असे नेत्यांनी मत व्यक्त केले.
गेवराई नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश अत्यंत महत्त्वाचा ठरत असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने “गेवराई नगरपरिषद पूर्ण ताकदीने लढणार आणि विजय मिळवणार” असा निर्धार व्यक्त केला आहे.राजकीय निरीक्षकांच्या मते, जानमोहमंद बागवान यांचा स्वच्छ प्रतिमा, जनसंपर्क आणि स्थानिकांमधील मजबूत पकड लक्षात घेता हा प्रवेश गेवराईतील आगामी राजकीय समीकरणे बदलवणारा ठरू शकतो.
भाजपमध्ये अंतर्गत नाराजी आणि राष्ट्रवादीत नवचैतन्य—या समीकरणामुळे गेवराईच्या राजकारणात नव्या घडामोडींना सुरुवात झाली आहे.
















