गेवराई प्रतिनिधी : सध्या गेवराई शहरांमध्ये नगर परिषद निवडणूकीचा प्रचार चांगलाच रंगात आलेला आहे. नगराध्यक्ष पदासाठी सौ. शितल महेश दाभाडे यांनी प्रचारात चांगलीच आघाडी घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या महिला आघाडीच्या महिला रणरागिणी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार अमरसिंह पंडित व आमदार विजयसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण शहरभर प्रचार रॅली काढून मतदारांशी संपर्क करत आहेत. या रॅलीला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या महिला आघाडीच्या विधानसभा क्षेत्राध्यक्ष सौ. मुक्ताताई आर्दड (मोटे) म्हणाल्या कि, १० वर्ष आमदार असताना लोकांची अवहेलना करणारे व लोकांनाच माझी गरज आहे असे म्हणणारे आता परत दारोदार जाऊन मतांचा जोगवा मागायला लागले आहेत. कारण त्यांना त्यांचा पराभव दिसू लागला आहे. मतदार राजा मात्र सर्व लक्षात ठेऊन योग्य वेळेला उत्तर देत असतो. याचा प्रत्यय विरोधकांना येत आहे. मतदारांनी कित्येक ठिकाणी त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार करुन निरुत्तर केले आहे. मतदार राजाला सर्व समजते त्यामुळे येणाऱ्या नगरपरिषद निवडणुकीत माजी आमदार अमरसिंह पंडित व आमदार विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्ष पदासहीत सर्व नगरसेवक निवडून देऊन शहराच्या विकासाची संधी द्यावी असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडीच्या पल्लवी गोगुले, योगिता तांबारे, किरण दाभाडे, शिला पैठणे, अनिता काळे, निता बेद्रे, संगीता घोडके, प्रिती दाभाडे, सीमा होंडे, सीमा जवंजाळ,
प्रणिता रूकर यांच्या सह शेकडो महिला सहभागी आहेत.

















