• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Saturday, March 28, 2026
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result
Prarambh Live | Latest Marathi News Update
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
  • बीड जिल्हा
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
ADVERTISEMENT
Home बीड जिल्हा परळी

आता पक्षाची सत्ता आणायचीयं ; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका जिंकून बीड जिल्ह्यात विकासाचा ‘दीपोत्सव’ साजरा करा – ना. पंकजाताई मुंडे

Prarambh Team by Prarambh Team
October 26, 2025
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

दीपावली स्नेहमिलन उत्साहात: ना.पंकजाताई मुंडेंनी भाजप पदाधिकारी – कार्यकर्त्यांना दिला ‘सामाजिक सौहार्द’ व ‘कर्मयोगाचा’ मंत्र !

बेरजेचं राजकारण ; जिल्ह्यातील दिग्गजांची बांधली मोट:माजी मंत्री बदामराव पंडित, माधवराव निर्मळांचा प्रवेश तर बाळराजे पवार व केशवराव आंधळेंची ताईंच्या नेतृत्वावर निष्ठा

कार्यकर्त्यांना ‘थॅंक यू’ म्हणत व्यक्त केली कृतज्ञता तर  ‘हटायचं नाही आता जिंकायचचं’ म्हणत चेतवले स्फुल्लिंग

परळी वैजनाथ :
मला आता पक्षाची सत्ता आणायची आहे. आपण कोणतेही नियम न तोडता काम करायचे आहे, मात्र समोरच्यांनी जर नियम तोडले तर आपण कसे गप्प बसायचे नाही, म्हणून आम्ही देखील निर्णय घेत आहोत, अनेक अपक्षांना आता आपण पक्षात घेत आहोत. बदामराव पंडित,माधव निर्मळ यांना पक्षात घेतले आहे आणि आम्हाला आमचा पक्ष वाढवायचा आहे. आता युती होईल की नाही ते पक्ष ठरवेल. मात्र आम्ही काम करणार आहोत. त्यामुळेच ही सोन्यासारखी माणसं मी निवडले आहेत, असं प्रतिपादन राज्याच्या पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी येथे केलं.
दीपावली हा सण प्रत्येकाचे जीवन प्रकाशमान करणारा सण आहे असाच आपला निर्धार असुन बीड जिल्ह्यात विकासाचा ‘दीपोत्सव’ साजरा करायचा आहे. हा कार्यक्रम नवा विचार व प्रेरणा निर्माण करण्याच्या दृष्टीने जाणीवपूर्वक अराजकीय नाही तर राजकीय स्वरूपाचा आपण आयोजित केला. आज पर्यंतच्या सुखदुःखाच्या सर्व वाटचालीत तुम्ही माझ्या पाठीशी खंबीर उभे राहिलात, सत्ता असो अथवा नसो माझ्या नेतृत्वाची गरीमा कायम ठेवली याबद्दल सर्वांना थँक्यू म्हणण्यासाठी आजचा कार्यक्रम असल्याचे सांगत पंकजाताई मुंडे यांनी कार्यकर्त्यांप्रति कृतज्ञ भावना व्यक्त केली. त्याचबरोबर आता मागे हटायचे नाही तर जिंकायचेच असा ठाम विश्वास व्यक्त करत येणाऱ्या जि.प., पं. स. व न.प निवडणुका ताकदीने लढवून जिंकून दाखवा असे आवाहन करत पंकजाताई मुंडे यांनी कार्यकर्त्यांमध्ये स्फुल्लिंग चेतवले.
बीड जिल्ह्यातील भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठी आयोजित केलेल्या दीपावली स्नेह मिलन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. व्यासपीठावर माजी खासदार डॉ. प्रीतमताई मुंडे, भाजपा जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख, माजी मंत्री बदामराव पंडित, माजी आमदार केशवराव आंधळे, माधवराव निर्मळ, गेवराईचे बाळराजे पवार आदींसह भाजपचे जिल्ह्यातील  पदाधिकारी, सर्व आघाड्यांचे प्रमुख आदी उपस्थित होते.

विकासाचा ‘दीपोत्सव’ साजरा करा
————–
दीपावली स्नेहमिलनाच्या कार्यक्रमात ना. पंकजाताई मुंडे यांनी संघर्ष, निष्ठा, सामाजिक सौहार्द आणि विकास यांचा मिलाफ घडवणारे धडाकेबाज भाषण करून कार्यकर्त्यांना नव्या जोमाने प्रेरित केले. आपल्याला बीड जिल्ह्यात सर्वदूर व सर्वांगीण विकास करायचा आहे. आपण कधीच विकासात जात,धर्म, पंथ व मतांचे गणित हे पाहिलेले नाही. लोकनेते गोपीनाथराव मुंडेंचे संस्कार व विचार यावरून कधीही ढळलेलो नाही.आज पर्यंतच्या सुखदुःखाच्या सर्व वाटचालीत तुम्ही माझ्या पाठीशी खंबीर उभे राहिलात, सत्ता असो अथवा नसो माझ्या नेतृत्वाची गरीमा कायम ठेवली.  त्यामुळे आपली कामाची गती थांबणार नाही असा ठाम  निर्धार  त्यांनी यावेळी व्यक्त केला.

_मुंडे साहेबांचा विचार, संस्कार व विश्वास निभावला!_
———————
मुंडे साहेबांनी मला आमदार केलं. एक डझन आमदारांना ‘माझी लेक भारी’ असं ते म्हणाले होते.त्यांचा विचार, संस्कार व विश्वास निभावला तो सार्थ करण्यासाठी आयुष्यभर काम करणार आहे. मुंडे साहेबांच्या पश्चात लाखो लोकांनी मला जपलं, माझ्यावर डोळस विश्वास दाखवला.पद असो वा नसो, माझी गरिमा राखली.आपण  जातीवर आधारित राजकारण कधीच केलं नाही. चुकीचं समर्थन केलं नाही.माझ्या कार्यकर्त्यांकडूनही चुक होवू नये असेच प्रयत्न केले. चुकीला कधीच थारा दिला नाही. तसेच  राजकारणातील यश- अपयशाबद्दल मला कोणाचा राग आलेला नाही. पण माझ्या लोकसभेतील हरण्याने काही लोकांनी मरण पत्करले हे जिव्हारी लागलेलं आहे.त्यामुळे आता मरायचं पण हरायचं नाही असा आपला ठाम निर्धार आहे. सत्ता सर्वांचे हित करण्यासाठी असते मी तेच करत राहणार असे पंकजाताई मुंडे यांनी सांगितले.

_आता पारितोषिकाचा काळ!_
——————–
राजकारणातील संघर्षाचा काळ मी आणि तुम्ही अनुभवला आहे. खूप परीक्षा दिल्या, पण आता पारितोषिक मिळालं आहे. आजपर्यंतची आपण पक्षाची भूमिका प्रामाणिकपणे पाळलेली आहे. कोणी काहीही म्हणो परंतु आपली वाटचाल ही सकारात्मक, सत्य व प्रामाणिकच राहणार आहे.अनैतिक काही केलं नाही,कधी करणारही नाही. लोकांच्या हिताच्या आड कोणी येऊ नये याची मात्र निश्चित काळजी घेणार असा विश्वास ना.पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केला.

माझे काम समाजातील सर्व घटकांसाठी
——————
आपण सगळे मिळून समाजात सौहार्द निर्माण करू, पण चुकीचं होत असेल तर समर्थन करणार नाही. कधी कधी आपल्या बोलण्याचे चुकीचे अर्थ काढले जातात आणि तेच समोरच्या व्यक्तीला चुकीच्या पद्धतीने दाखवून गैरसमज व तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र आता सर्वांना सोबत घेऊन सामाजिक सौहार्दा साठी आपण पुढाकार घेणार आहोत. मनोज जरांगे पाटील यांच्यावर आपण कधीच टीकाटिप्पणी केलेली नाही. ते राजकारणातही नाहीत. त्यामुळे एखाद्या समाजाला न्याय मिळवून देण्याच्या भूमिकेत असणाऱ्या व्यक्तीबद्दल बोलण्याचा प्रश्नच येत नाही. परंतु त्यांना काही लोक चुकीचे अर्थ दाखवून प्रतिमा हनन करण्याचा प्रयत्न करतात.गुलामीचं गॅझेट,गुलामाची औलाद असं आपण कधीच म्हटलेलं नाही. तसेच जालन्याच्या पालकमंत्री म्हणून त्या ठिकाणी सुरू असलेल्या उपोषणांना भेटी देणे ही आपली जबाबदारी आहे. त्या अनुषंगाने आपण धनगर आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले उपोषणकर्ते, त्याचबरोबर बंजारा समाजाच्या आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या उपोषणकर्त्यांना भेटलो व कायद्याच्या चौकटीत जे शक्य असेल ते प्रामाणिकपणे करण्याचा शब्द आपण सरकारच्या वतीने त्यांना दिला. संविधानाने दिलेल्या हक्कानुसार व कायद्यानुसार प्रत्येक अन्याय झालेल्या घटकाला न्याय मिळाला पाहिजे ही मुंडे साहेबांची भूमिका होती तीच आपली ही भूमिका आहे. ती सातत्याने मांडली आहे. त्यामुळे एखाद्या समाजाच्या न्यायासाठी लढणाऱ्या व्यक्तीबद्दल वाईट बोलणे हे आपले संस्कार नाहीत. त्यामुळे मनोज जारंगे पाटील यांना सुद्धा मी दिवाळीच्या शुभेच्छा व्यक्त करते असेही पंकजाताई मुंडे यांनी यावेळी सांगितले.

_कार्यकर्त्यांना दिला ‘कर्मयोगाचा’ मंत्र_

येणाऱ्या काळातील निवडणुकांमध्ये आपण पक्ष म्हणून ताकतीने निवडणुका लढवणार आहोत. महायुती असल्याने युती बाबतचा निर्णय जो होईल त्या अनुषंगाने या निवडणुका आपल्याला लढायच्या आहेत. मात्र जिंकायचेच हा निर्धार मात्र प्रत्येकाने केला पाहिजे. कार्यकर्ता मारून कोणताही पक्ष राजकारण करत नसतो. त्यामुळे सर्वांना न्याय देण्याची भूमिका निश्चित असेल. अनेक जण आज आपल्या सोबत आले आहेत, येणार आहेत. सर्वांना सोबत घेऊन येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये आपल्याला जिंकायचे आहे. त्या दृष्टीने कामाला लागा असे आवाहन पंकजाताई मुंडे यांनी यावेळी केले. तसेच पुढच्या वर्षीच्या दिपावली स्नेहमिलनात जिल्हा परिषद अध्यक्ष, पाच-सहा सभापती, सहा नगराध्यक्ष, तीस-पस्तीस जि.प. सदस्य, अशा रांगा लावा असं सांगत त्यांनी उपस्थितांमध्ये उत्साह निर्माण केला.

बेरजेचं राजकारण ; बदामराव पंडित, माधव निर्मळ भाजपात

दरम्यान, आजच्या दीपावली स्नेह मिलन कार्यक्रमात पंकजाताई मुंडे यांनी बेरजेचे राजकारण करत आगामी निवडणुकांच्या दृष्टीने जिल्ह्यातील दिग्गजांची मोट बांधल्याचे दिसून आले.  यावेळी गेवराईचे माजी मंत्री बदामराव पंडित, माजलगांवचे  नेते माधवराव निर्मळ यांचा भाजपात जाहीर प्रवेश झाला तर भाजपमध्येच असणारे पण मधल्या काळात दुरावलेल्या गेवराईचे बाळराजे पवार व माजी आमदार केशवराव आंधळे यांनी  ताईंच्या नेतृत्वावर निष्ठा व्यक्त करत जोमाने कामाला लागण्याचा संकल्प व्यक्त केला.

पंकजाताई जिल्हयाच्या समृध्दीचा महामार्ग – डाॅ प्रीतमताई

आपल्या सर्वाच्या लाडक्या नेत्या पंकजाताई मंत्री झाल्या, हिच खरी आपली दिवाळी आहे. त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज दोन नेत्यांनी भाजपात प्रवेश केला. जिल्हा बळकट करायचा असेल तर ताईचे हात बळकट करा असं सांगत डाॅ. प्रितमताई मुंडे यांनी पंकजाताई ह्या जिल्ह्याच्या समृध्दीचा महामार्ग असल्याचे यावेळी म्हटले. कार्यक्रमाचे संचलन भाजपचे प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केले.





Previous Post

अशोक पटवर्धन यांच्या उपस्थितीत अनिलदादा जगताप यांनी नगर पालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले!

Next Post

सत्तेचा उपयोग दर्जेदार विकास कामांसाठीच होईल – अमरसिंह पंडित

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

March 9, 2026

March 6, 2026
Beed तालुक्यात कांद्याच्या पिकात अफूची बेकायदेशीर शेती करणाऱ्यावर पोलिसांचा छापा

Beed तालुक्यात कांद्याच्या पिकात अफूची बेकायदेशीर शेती करणाऱ्यावर पोलिसांचा छापा

February 27, 2026
परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

February 20, 2026
आ. विजयसिंह पंडित पोलिस अधीक्षक यांना बोलले : शेख मुजीब यांच्यासह नगरसेवक, नागरिकांचा ठिय्या 

आ. विजयसिंह पंडित पोलिस अधीक्षक यांना बोलले : शेख मुजीब यांच्यासह नगरसेवक, नागरिकांचा ठिय्या 

February 16, 2026
सुभाष सपकाळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती — राजेंद्र मस्के

सुभाष सपकाळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती — राजेंद्र मस्के

February 16, 2026
संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण कार्यक्रमाच्या प्रमुखांनी घेतली ना.पंकजाताई मुंडे यांची भेट

संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण कार्यक्रमाच्या प्रमुखांनी घेतली ना.पंकजाताई मुंडे यांची भेट

February 16, 2026
बीडमध्ये अंबिका चौक, राजीव गांधी चौकातील सर्व अडथळे तत्काळ हटवा

बीडमध्ये अंबिका चौक, राजीव गांधी चौकातील सर्व अडथळे तत्काळ हटवा

February 16, 2026
शेत रस्त्यांचे प्रस्ताव दाखल करा – आ. विजयसिंह पंडित

शेत रस्त्यांचे प्रस्ताव दाखल करा – आ. विजयसिंह पंडित

February 13, 2026
ग्रामीण भागात उद्योजक घडावेत यासाठी पशुपालनाला कृषी चा दर्जा – पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

ग्रामीण भागात उद्योजक घडावेत यासाठी पशुपालनाला कृषी चा दर्जा – पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

February 13, 2026
Next Post
सत्तेचा उपयोग दर्जेदार विकास कामांसाठीच होईल – अमरसिंह पंडित

सत्तेचा उपयोग दर्जेदार विकास कामांसाठीच होईल - अमरसिंह पंडित

बीड नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरून घ्यावेत

बीड नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरून घ्यावेत

कुंडलिक खांडेंचा पुन्हा शिवसेनेत प्रवेश; स्वत: ठाकरेंनी बांधले शिवबंधन

कुंडलिक खांडेंचा पुन्हा शिवसेनेत प्रवेश; स्वत: ठाकरेंनी बांधले शिवबंधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

March 9, 2026

Beed तालुक्यात कांद्याच्या पिकात अफूची बेकायदेशीर शेती करणाऱ्यावर पोलिसांचा छापा

परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

आ. विजयसिंह पंडित पोलिस अधीक्षक यांना बोलले : शेख मुजीब यांच्यासह नगरसेवक, नागरिकांचा ठिय्या 

सुभाष सपकाळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती — राजेंद्र मस्के

तारखेनुसार बातमी शोधा !

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

वाचक संख्या


Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा