राष्ट्रवादी कडे आ. संदीप क्षिरसागर आश्वासक चेहरा- सलीम भाई
स्व. संतोष देशमुख हत्या प्रकरणात आ. संदीप क्षीरसागरांची भुमीक महत्तवाची– राजेंद्र मस्के
बीड प्रतिनिधी : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक अनुषंगाने बीड व शिरूर तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती गटातील कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने बोलावली होती.
या बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आ. संदीप क्षीरसागर व जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या प्रमुख उपस्थितीत
राष्ट्रवादी भवन बीड येथे झालेल्या बैठकीला कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती. जागे अभावी निम्म्याहुन अधिक कार्यकर्ते राष्ट्रवादी भवन परिसरात उभे उभे राहून बैठकीला हजर होते होते.
उपस्थित उत्साही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आमदार संदीप क्षीरसागर यांनी आक्रमक भूमिका मांडताना म्हणाले की, कार्यकर्त्यांचा उत्साह आणि गर्दी लक्षात घेता विरोधकांना उमेदवार मिळतील की नाही अशी माझ्या मनात शंका आहे.
बीड व शिरूर तालुक्यातील सर्व त्या सर्व जिल्हा परिषद व पंचायत समिती गणात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष साठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. मी माझ्या भूमिकेशी प्रामाणिक राहिलो याची ही पोहच पावती आहे. कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणुकीत माझ्या विजयासाठी अहोरात्र मेहनत घेतली.
प्रसंगी जीवाची बाजी लावली. आता कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. मी देखील कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून साथ देणार आहे. मतदार बंधू निवडणुकीची वाट पाहत आहेत. परंतु हे सरकार निवडणुका पुढे ढकलून पळ
काढण्याच्या मनस्थितीत आहे. आता कोणाची सुट्टी नाही. निश्चितपणे विरोधकांना त्यांची जागा दाखवू. सर्वांना सोबत घेऊन ही निवडणूक एकजुटीने लढू. जातीयवादाला बळी न पडता आपल्याला पुढे जायचे आहे. विरोधक मराठा- ओबीसी, हिंदू- मुस्लिम जातीयतेचे विष पेरून दिशाभूल करतील.
हे सामान्य जनतेच्या लक्षात आले आहे. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कोणत्याही जातीय वादाला बळी न पडता एक दिलाने निवडणूक लढवायची आहे असे विचार आ. संदीप क्षरसागर यांनी मांडले.
या बैठकीस मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी सरकारच्या कार्यपद्धतीचा समाचार घेताना म्हणाले की,
अतिवृष्टीमुळे बीड जिल्ह्यात भयानक संकट आले होते.
अतिवृष्टीने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे शेती व पिकाचे प्रचंड नुकसान झाले.
दिवाळीपूर्वी नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात पडेल व सर्वांची दिवाळी गोड होईल अशी घोषणा सरकारने केली. परंतु
अद्याप शेतकऱ्यांच्या खातात पैसा पडला नाही. सरकारची घोषणा वल्गना ठरली व शेतकऱ्यांच्या नशिबी काळी दिवाळी साजरी करण्याची वेळ आली.
नुकसान भरपाई देताना सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली. बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 577 कोटी ची घोषणा झाली. ही मदत अत्यंत तुटपुंजी असून पर गुंठा केवळ 35 रुपये देऊन शेतकऱ्यांची थट्टा केली.
शेतकऱ्यांच्या शेतासह त्यांच्या घरात पाणी गेले. नुकसानीचा विचार न करता निकष लावून शेतकऱ्यांना अनुदानापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न सरकारने केला. ज्या शेतकऱ्यांच्या विहिरी नदीकाठी आहे अशा वाहून गेलेल्या विहिरींना अनुदान मिळणार नाही असे बोलले जाते. कोणताही शेतकरी विहीर खोदताना ज्या ठिकाणी पाणी लागेल अशा ठिकाणी विहिरी खोदतो. पाण्याची हमी म्हणून कित्येक वर्षापासून शेतकरी नदीकाठी विहीर खोदतात. याचे भान शेतकऱ्यांनी ठेवले नाही. शेतकऱ्यांविषयी त्यांच्या मनात असता राहिलेली नाही. अतिवृष्टी परिस्थितीत ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने आपतग्रस्तांना मदतीचे काम केले आहे.
ज्या ज्या वेळीअन्याय अत्याचार होतो
तेव्हा पक्षाने विरोधकाची भूमिका प्रभावीपणे मांडली.
स्वर्गीय संतोष देशमुख आत्या प्रकरणात आपले आमदार संदीप क्षीरसागर यांच्या आक्रमक भूमिकेमुळे
सर्व आरोपी जेलबंद झाले.
त्यांना या प्रकरणात राजकीय किंमत मोजली परंतु देशमुख कुटुंबांना उघड पडू दिलं नाही न्याय हक्कासाठी जगत आहेत. असे विचार राजेंद्र मस्के यांनी यावेळी मांडले.
पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार सय्यद सलीम भाई या बैठकीस मार्गदर्शन करताना म्हणाले की,
विरोधक कोणता मुद्दा व कोणते धोरण घेऊन लोकांच्या समोर जाणार आहेत. गटातटाच्या राजकारणात गुंतलेले असून, राजकीय स्वार्था शिवाय त्यांना विकासाचे देणे घेणे नाही. आपल्याकडे आश्वासक चेहरा आपले लोकप्रिय आमदार संदीप क्षीरसागर आहेत. आपत्तीग्रस्त परिस्थितीत त्यांनी लोकांना केलेली मदत दिलेला आधार जनतेने अनुभवला. जनतेचा कौल अन्याया विरुद्धात आहे. यामुळेही या निवडणुका कार्यकर्त्यांसाठी सोपे आहेत कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणातील
मतदार बांधवांची थेट संपर्क वाढवावा. असे आवाहन केले आहे. या बैठकीस ज्येष्ठ नेते डि. बी. बागल, वैजनाथ तांदळे, के. के. वडमारे, शिवराज बांगर, मदन जाधव सर, माऊली दादा, हांगे दादा,धनंजय जगताप, मिलन बापू मस्के, बाळासाहेब गोरे, खुर्शीद आलम,यांसह तालुक्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, गावागावातील जबाबदार सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.














