खा.बजरंग सोनवणेंवर विश्वास ठेवून झेडपी सदस्य ते सरपंचांनी केला प्रवेश
बीड: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने दि.१६ ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष केज तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक येडेश्वरी साखर कारखाना युनिट नं.१, आनंदगाव (सा.) येथे संपन्न झाली. यावेळी बैठकीत कार्यकर्त्यांनी प्रवेशासाठी अक्षरश: रांग लागली हेाती. यावेळी आगामी निवडणूक कार्यकर्त्यांची निवडणूक असल्याने कार्यकर्त्यांच्या पाठिशी उभा राहून ताकद देऊ, असा विश्वास खा.बजरंग सोनवणे यांनी दिला. येडेश्वरी साखर कारखाना येथील बैठकीत बनसारोळा येथील माजी जि.प.सदस्य अशोक गायकवाड, माजी सरपंच युवराज काका काकडे, चिंचोलीमाळी येथील लहुजी वस्ताद सेवाभावी संस्था चे अध्यक्ष विठ्ठल झाडे, पिसेगाव येथील नवनाथ नेहरकर, आनेगावचे माजी सरपंच आप्पासाहेब हंडीबाग, श्री. एकनाथ हंडीबाग, विष्णू इंगळे, बिभीषण राऊत, विक्रम हंडीबाग, भैरवनाथ हंडीबाग, श्रीधर हंडीबाग, लक्ष्मण हंडीबाग, श्री. जिवराज हंडीबाग, श्री. नरसिंग हंडीबाग, नवनाथ हंडीबाग, अशोक हंडीबाग, नानासाहेब हंडीबाग, ज्ञानेश्वर खोडसे, श्री. दशरथ हंडीबाग, श्री. तुकाराम इंगळे, युसूफ वडगाव येथील युवा कार्यकर्ते विजय भूमकर, शिवानंद खरबड, शांतिलिंग खरबड तसेच असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) पक्षात प्रवेश केला. बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद चंद्र पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षा मा.आ.संगिता ठोंबरे, मा.आ.पृथ्वीराज साठे, पं.स.केज माजी सभापती अशोक तात्या तारळकर, खरेदी विक्री संघ केजचे अध्यक्ष बालासाहेब दादा बोराडे, मा.जि.प.सदस्य युवराज गोरे, माजी अध्यक्ष विलास जोगदंड, पंचायत समिती केजचे माजी सभापती ज्ञानेश्वर चवरे, केज तालुकाध्यक्ष शंकर जाधव, महिला तालुकाध्यक्ष तसलीम इनामदार, केज शहराध्यक्ष शब्द्दो खतीब माजी पं.स.सदस्य बंडू चौधरी, पिंटू ठोंबरे, गुंडाप्पा भुसारी, प्रेमचंद कोकाटे, न.पं.केजचे नगरसेवक भाऊसाहेब गुंड, बालासाहेब जाधव, माजी नगरसेवक कपिल मस्के, शरीफ सय्यद, शितल लांडगे, विमल जोगदंड, व पंचक्रोशितील सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन, व्हा.चेअरमन, संचालक तसेच असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीत पक्ष संघटन बळकटीकरण, मतदारांपर्यंत पक्षाची भूमिका पोहोचविणे आणि आगामी निवडणुकीसाठी सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने, शिस्तबद्ध पद्धतीने काम करण्यावर भर देण्यात आला. |