डॉ.योगेश क्षीरसागर यांनी मानले उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजितदादा पवार यांचे आभार
बीड प्रतिनिधी : शहरातील ऐतिहासिक कंकालेश्वर मंदिराच्या जतन व दुरुस्ती कामासाठी ९ कोटी १४ लाख ५४ हजार ४०३ रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. हा भरीव निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड विधानसभा अध्यक्ष डॉ.योगेश क्षीरसागर यांनी उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांचे आभार मानले आहेत.
बीड शहरातील कंकालेश्वर मंदिर जुने व ऐतिहासिक असल्यामुळे जतन व दुरुस्तीची आवश्यकता होती. या पार्श्वभूमीवर डॉ.योगेश क्षीरसागर यांनी निधीची मागणी केली होती. कंकालेश्वर मंदिर हे बीड शहरातील प्राचीन व भव्य शिवमंदिर असून, ते सुमारे १० व्या ते १२ व्या शतकादरम्यान बांधले गेले असावे, असे मानले जाते. मंदिराचे धार्मिक व ऐतिहासिक महत्त्व मोठे आहे. बाह्यभागावरील शिल्पकला ही मराठवाड्यातील प्राचीन वास्तुकलेचे उत्तम उदाहरण मानली जाते. महाशिवरात्री व श्रावण महिन्यात येथे हजारो भाविक दर्शनासाठी येतात. मंदिराच्या संवर्धनासाठी सातत्याने मागणी होत होती. या मागणीची दखल घेत ना.अजितदादा पवार यांनी पाठपुरावा केला. त्यानंतर हा विषय मार्गी लागून शासन निर्णय जारी झाला आहे, तसेच पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाचे संचालक यांना नियंत्रण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड विधानसभा अध्यक्ष डॉ.योगेश क्षीरसागर यांनी या निधीस मंजुरी मिळवून दिल्याबद्दल अजितदादा पवार यांचे आभार मानले आहेत.