शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी
बीड प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ.शशिकांत शिंदे यांनी बीडसह तालुक्यात अतिवृष्टी झालेल्या भागाचा दौरा करत नुकसानीची पाहणी केली.
बीड जिल्ह्यासह तालुक्यात मागील चार दिवसांपासून जोरदार पाऊस झाला आहे. अनेक महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या अतिवृष्टी झालेल्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ.शशिकांत यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी शासनाकडे बीड जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाईची देण्याची मागणी केली.
बुधवार (दि.२४) रोजी बीड मतदारसंघातील पिंपळवाडी, बेलखंडी पाटोदा, नागझरी, मानेचावाडा, कचारवाडी, दत्तनगर (बे.पाटोदा), शिरापूर गात, शिरूर तालुक्यातील निमगाव, नांदेवली परिसरात सिंधफणा नदीला आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांचे शेत, पिके, घरे व जनजीवन मोठ्या प्रमाणात उध्वस्त झाले आहे. याठिकाणी अनेकांचे संसार पाण्यात वाहून गेले आहे. अशा गंभीर परिस्थितीची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ.शशिकांत शिंदे यांनी पाहणी केली. तसेच अनेक भागात पूरग्रस्त भागांत जाऊन नुकसानीची पाहणी करत घरांचे झालेले नुकसान, पाण्याने वाहून गेलेले साहित्य यासंदर्भात माहिती घेतली. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांशी आणि
नागरिकांशी संवाद साधत त्यांना धीर दिला व शासनाच्या वतीने मदतीलबून देण्यासाठी प्रयत्न करण्याचा शब्द दिला.
या पाहणी दरम्यान बीड जिल्ह्याचे खासदार मा. बजरंग बप्पा सोनवणे, रा.काँ. पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के,
बीड मतदार संघाचे आ.संदीप क्षीरसागर सोबत होते.