बीड प्रतिनिधी : बीड मतदारसंघात मागील काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले असून बीड विधानसभेचे आ.संदीप क्षीरसागर यांनी नुकसान झालेल्या ठिकाणी जाऊन पाहणी केली.
बीड मतदार संघातील मौजे वासनवाडी गावातील तलाव मागील काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे फुटला आहे. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आ.संदीप क्षीरसागर यांनी शेतीच्या बांधावर जाऊन पाहणी केली. गावकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी तलाव तात्काळ दुरूस्त करण्याचे व संबंधित प्रशासकीय विभागाला पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच बीड शहरातील मोमीनपुरा भागात दोन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे नाल्याचे पाणी नागरिकांच्या घरामध्ये शिरले होते. या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्यात आल्या आहेत. आ. संदीप भैय्यांनी बुधवारी प्रत्यक्ष स्थळी जाऊन नाल्याच्या खोदकाम व स्वच्छता कामांची पाहणी केली. नाला स्वच्छतेनंतर पाणी घरामध्ये घुसण्याची शक्यता राहणार नाही याची खात्री केली.
*चौकट*
*शहरातील नागरिकांना पाणी पुरवठा सुरळीत होईल*
बीड शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन जेसीबी चालकाकडून जुना पुल येथे स्वच्छता काम करताना चुकून फुटली होती. त्याठिकाणी पुलाच्या खालची स्वच्छता देखील या कालावधीत करण्यात आली. नुकसान झालेल्या पाईपलाईन जोडणीचे काम आज रात्रीपर्यंत पुर्ण होईल. शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा सुरळीत होण्यास विलंब होणार आहे यांची शहरातील नागरिकांनी नोंद घ्यावी.