बीड : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचा अधिकाधिक लाभ, पात्र लाभार्थ्यांना व्हावा या उद्देशाने बीड शहरामध्ये महामंडळाच्या मराठवाड्यातील उपविभागीय कार्यालयाचे आज मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले.
याप्रसंगी महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, श्रीक्षेत्र नारायणगडचे महंत शिवाजी महाराज, धनंजय देशमुख आदी उपस्थित होते. उद्घाटन कार्यक्रम जालना रोडवरील राजू कॉम्प्लेक्स येथे पार पडला.
मराठा समाजाला आर्थिक सक्षम करायचे ध्येय असून त्यासाठी महामंडळाकडून अधिक मेहनत, परिश्रम घेण्यात येईल, असे पाटील यावेळी म्हणाले.
या कार्यालयाच्या उद्घाटनानंतर यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात मेळावाही पार पडला. मेळाव्यास बहुसंख्येने उपस्थिती होती. या कार्यक्रमातही पाटील यांनी मार्गदर्शन केले.