बीड : प्रतिनिधी : बीड शहर मरणयातना भोगत आहे. उघडे रोहित्र, उघड्या नाल्या, सर्वत्र खड्डे, कचऱ्याचे ढिगारे, शहरवासियांच्या पिण्याच्या पाण्याचं नियोजन या सारख्या शेकडो समस्या म्हणजे शहरवासियासाठी मरणयातनाचं, पालकमंत्री म्हणून अजितदादा पवार आपण लक्ष घाला, बारामती जशी महाराष्ट्रासाठी आयडॉल आहे तसे बीड करा, बीड मध्ये नवं पर्वाची थीम घेऊन मिरवणाऱ्यानां आपली बारामती दाखवा. दादा आपणाकडुन शहरवासियांच्या खुप अपेक्षा आहेत याला तडा जाऊ देऊ नका. आज शिवसैनिकांनी एका खड्डयाचे नमकरण पालकमंत्री केले तर बाकी खड्डे पालकमंत्र्याची लाभार्थी पिलावळं असल्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख उल्हास गिराम यांनी सांगितले.
आज बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते राजुरी वेस या मार्गांवर असणाऱ्या खड्डया संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आंदोलन निदर्शने करण्यात आली. या मार्गांवरील मुख्य खड्डयाला पालकमंत्री खड्डा असे नाव देऊन खड्डयाचे नामकरण करण्यात आले, तर बाकी छोटी – मोठी खड्डे पालकमंत्र्याची लाभार्थी पिलावळे असल्याचे शिवसैनिकांनी जाहीर केले. खड्ड्यात पालकमंत्र्याची प्रतिमा ठेऊन गुलाल बुक्का व हार घालून, ढोल तशे वाजवून जिल्हाप्रमुख उल्हास गिराम यांनी लक्षावेधी आंदोनल केले.
बीड शहरातील प्रमुख रस्ता म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज चौक ते राजुरी वेस हा होय, या मार्गांवर आज शेकडो खड्डे आहेत. या मार्गांवर नगर पालिका आहे, जिल्हा परिषद आहे. याच मार्गे विध्यार्थी शाळा- महाविद्यालयात जातात, जिल्हा रुग्णालयात नागरिक जातात, ग्रामीण भागातील शेतकरी आपला भाजीपाला घेऊन याच मार्गे बाजारपेठेत जातात, स्थानिक व्यापारी याच मार्गांवर आपले व्यवसाय करतात. अजितदादा आपण पालकमंत्री आहात, आपण एकदा शहरात फिरून सर्वे करावा म्हणजे शहरवासीयांच्या समस्या लक्षात येतील. आपणा पुढे नवपर्वांची थीम घेऊन मिरवणाऱ्या पिलावळीनां थोडी समाज द्या, त्यांना आपली बारामती फिरून दाखवा, बीड ची भानामती होऊ देऊन नका असे जिल्हाप्रमुख उल्हास गिराम यांनी सांगितले.
यावेळीमहिला संघटिका मीराताई नवले ,उपजिल्हाप्रमुख संजय महाद्वार, उपजिल्हाप्रमुख राजुभाऊ महुवाले, रतन तात्या गुजर, विधानसभा प्रमुख सुशील पिंगळे ,नवनाथ प्रभाळे , थिगळे विशाल , गणेश लोणकर ,विनोद गोरख ,जगदीश गिराम ,प्रदीप कोठुळे, सतीश सिंह परदेशी, शरद पवार, दिलीप पवार , मच्छिंद्र काळे, चंदूनाना कागदे, प्रेम ताकतोडे, बळी कोटुळे, विशाल तांबे आदी शिवसैनिक मोठया संख्येने उपस्थित होते.