विकास कामांसह अतिक्रमणधारकांना पीटीआर वाटपाचा शुभारंभ होणार
महेश दाभाडे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी प्रवेश
आम्ही गोर-गरीबांचे अतिक्रमण नियमाकुल केले, विरोधकांनी स्वता:ची अतिक्रमणे नियमाकुल करण्यासाठी सत्तेचा वापर केला – आ. विजयसिंह पंडित
गेवराई प्रतिनिधी ः- विधानसभा निवडणुकीनंतर गेवराई शहरात १८ कोटी रुपयांचा निधी मंजुर झाला, अनेक वर्षापासुन प्रलंबित असलेला हक्काच्या पीटीआर चा प्रश्न कायमस्वरुपी निकाली निघाला. उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या नेतृत्वामुळे हे शक्य झाले. त्यांच्या शुभहस्ते विकास कामांसह अतिक्रमण धारकांना पीटीआर वाटपाचा शुभारंभ सोमवार दि. १९ मे रोजी सायं. ५.३० वा. गेवराई शहरात होणार आहे. या निमित्ताने आयोजित केलेल्या सभेला बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आ. विजयसिंह पंडित यांनी केले. गेवराई येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी माजी नगराध्यक्ष महेश दाभाडे यांच्यासह त्यांच्या सहकार्यांच्या पक्ष प्रवेशाची घोषणा केली.
गेवराई शहरातील १८ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांसह अतिक्रमणधारकांच्या हक्काच्या पीटीआर वाटपाचा शुभारंभ सोमवार दि. १९ मे सायंकाळी ५.३० वा. र.भ. अट्टल महाविद्यालय, गेवराई च्या प्रांगणावर होणार आहे. या प्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्हयाचे पालकमंत्री ना. अजितदादा पवार, राज्याच्या पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे, माजीमंत्री आ. धनंजय मुंडे, जयभवानी सह. सा. कारखान्याचे चेअरमन अमरसिंह पंडित, आ. सतिष चव्हाण, आ. विक्रम काळे, माजी आमदार बाळासाहेब आजबे, राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. सुनिल मगरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, भाजपाचे जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख स्वप्निल गलधर यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत. या निमित्ताने आयोजित केलेल्या सभेला बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आ. विजयसिंह पंडित यांनी केले आहे. या बाबत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पत्रकार परिषदेला आ. विजयसिंह पंडित यांच्या सह महेश दाभाडे, बीडचे माजी नगरसेवक निजाम शेख, सचिन मोटे, कृष्णा मुळे , मंजुर बागवान, विलास सुतार, राधेशाम येवले, किशोर कांडेकर यांच्यासह मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते.
यावेळी बोलतांना आ. विजयसिंह पंडित म्हणाले की, विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान दिलेल्या आश्वासनाची पुर्तता करण्याचे काम प्रमाणिकपणे सुरु आहे. अमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली गेवराई शहरातील अनेक विकासाची प्रलंबित कामे पुर्ण होत असल्याचा आनंद आहे. शहरातील गोर-गरीबांचे अतिक्रमण नियमाकुल करण्याचे काम आम्ही केले, या पुर्वीच्या सत्ताधार्यांनी स्वता:ची अतिक्रमणे नियमाकुल करण्यासाठी सत्तेचा वापर केला. अनेक वर्षापासुन प्रलंबित असलेला शहराच्या हद्दवाढीचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार असल्याची माहिती आ. विजयसिंह पंडित यांनी यावेळी दिली. माजी नगराध्यक्ष महेश दाभाडे व त्यांच्या सहकार्यांच्या पक्ष प्रवेशाची घोषणा पत्रकार परिषदेत आ. पंडित यांनी केली.
चांगले काम करणार्या शिवछत्र परिवारा सोबत राहणार – महेश दाभाडे
शिवछत्र परिवाराने कधीही सुडाचे राजकारण केले नाही, ज्यांच्या विरोधात मी लढलो त्यांनी मला जवळ केले हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. भैय्यासाहेब आणि विजयसिंह पंडित ग्राऊंड लेवलला राहुन काम करतात, त्यांना सामान्यांच्या प्रश्नांची जाण आहे. माझ्या सोबतच्या कार्यकर्त्याला राजकारणात सन्मानाचीवागणुक मिळावी यासाठी शिवछत्र परिवारासोबत भविष्यात काम करणार असल्याचे माजी नगराध्यक्ष महेश दाभाडे यांनी यावेळी सांगितले.