सर्वसामान्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी एकनाथजी शिंदे सक्षम- आनंदजी जाधव
बीड, प्रतिनिधी- हिंदुहृदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या विचारांना प्रेरित होऊन तथा महाराष्ट्रा राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब आणि संसदरत्न खा. डॉ श्रीकांत शिंदे साहेब यांच्या नेतृवाखाली सुरु असलेल्या शिवसेनेच्या दमदार अशा कार्यपद्धतीस प्रभावित होऊन ओबीसी व्ही जे एनटी सेना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बाळासाहेबजी किसवे साहेब आणि शिवसेना जिल्हाप्रमुख अनिलदादा जगताप, ओबीसी व्ही जे एनटी सेना महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख किरण चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली तथा ओबीसी व्ही जे एनटी सेना जिल्हाप्रमुख मनोज चव्हाण यांच्या माध्यमातून शिवसेना उप नेते आनंदजी जाधव, बीड जिल्हा संपर्कप्रमुख बाप्पुसाहेब मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत भटक्या विमुक्त समाजातील आप्पा राजाराम शिंदे ,भगवान शिंदे, भारत शिंदे, प्रकाश आप्पा शिंदे, गोरखनाथ धर्मराज बाबर, सुदाम संताराम चव्हाण, कृष्णा सुदाम चव्हाण, लक्ष्मण नारायण बाबर, सागर नारायण बाबर ,अर्जुन शिंदे, सखाराम दादाराव शिंदे, नाथा सुदाम शिंदे, उत्तम आप्पा शिंदे ,सुरेश शिंदे, विजय भगवान शिंदे, लखन सुदाम चव्हाण, ज्ञानेश्वर शिंदे, बाबुराव तुकाराम बाबर, राजू पुरुषोत्तम वाघेश्वर, किरण राजू वाघेश्वरी, करण अरुण वाघेश्वरी, नारायण गंगाराम चव्हाण, सागर शिवाजी शिंदे, ऋषिकेश बेद्रे या बांधवांनी जाहीर प्रवेश केला. दरम्यान शिवसेना उप नेते आनंदजी जाधव, जिल्हासंपर्क प्रमुख बाप्पुसाहेब मोरे यांच्यासह शिवसेना जिल्हाप्रमुख अनिलदादा जगताप, सचिन मुळूक, स्वप्नील गलधर यांनी भगवा झेंडा हाती देऊन भटक्या विमुक्त समाज बांधवांचे शिवसेनेत स्वागत केले. महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते बाळासाहेबांच्या विचारांचा रथ यथोचितपणे ओढत असून त्यांनी आपल्या मुख्यमंत्री काळात सामान्य जनतेसाठी अनेक हितदायी योजनांची उभारणी करत स्वतःला सिद्ध केले आहे यामुळेच बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार असणारे आपले नेते एकनाथजी शिंदे साहेब यांची ताकद वाढवण्याकरिता आपण सर्व जाती-धर्मातील कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन काम करणे गरजेचे आहे अशा भावना शिवसेना जिल्हाप्रमुख अनिलदादा जगताप यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात मांडल्या तर अठरा पगड जातीची वज्रमुठ एकनाजी शिंदे साहेबांची ताकद वाढविण्यासाठी कामी येणार असल्याचे मत शिवसेना बीड जिल्हा संपर्कप्रमुख बाप्पुसाहेब मोरे यांनी व्यक्त केले. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळूक, स्वप्नील गलधर तथा शिवसेना, युवासेना पदाधिकारी लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
—–
*चौकट-*
*सर्वसामान्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी एकनाथजी शिंदे सक्षम- आनंदजी जाधव*
भटका विमुक्त समाज हा विकासाच्या मुख्य प्रवाहापासून अलिप्तच राहिला आहे याचे दुःख आहे. पण आता काळजी नसावी, कारण महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब सर्वसामान्य जनतेसाठी अहोरात्र झटणारे, गोरगरीब व अनाथांच्या जीवनातील आशेचा किरण आहेत. प्रखर इच्छाशक्तीने राज्याच्या प्रगतीसाठी सतत कार्यरत असलेले लोकनेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब अठरा पगड जातीच्या कार्यकर्त्यांना सक्षम आधार आणि ताकद देणारे नेतृत्व आहे. भटका विमुक्त समाज आता विकासापासून वंचित राहणार नाही. आम्ही सर्वजण एकत्रितपणे आपल्या समस्या अडचणी सन्माननीय शिंदे साहेबांजवळ मांडून त्या सोडवू असे शिवसेना उप नेते आनंदजी जाधव यांनी आपल्या भाषणात म्हंटले.