बीड :- राज्याचे मा. उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार उद्या दिनांक 2 एप्रिल 2025 रोजी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे त्यांचा बीड जिल्हा दौरा पुढीलप्रमाणे आहे.
बुधवार दि. 2 एप्रिल 2025 रोजी सकाळी 7.00 वाजता छत्रपती संभाजीनगर विमानतळ येथे आगमन. सकाळी 7.15 वाजता हेलिकॉप्टरने बीडकडे प्रयाण. सकाळी 7.55 वाजता पोलीस परेड ग्राऊंड येथील हेलीपॅड पोलीस मुख्यालय, बीड येथे आगमन.
सकाळी 8.10 वाजता डॉ. योगेश क्षिरसागर यांच्या निवासस्थानी नगर रोड, बीड येथे आगमन. सकाळी 8.10 वाजता राखीव.
सकाळी 8.35 वाजता राष्ट्रवादी भवन कार्यालय, मित्र नगर, बीड येथे आगमन. सकाळी 8.35 वाजता पदाधिकारी कार्यकर्ते व अभ्यागतांच्या भेटीसाठी राखीव.
सकाळी 9.45 वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह बीड येथे आगमन. सकाळी 9.45 वाजता राष्ट्रवादी युवक काँग्रेस मेळावा. नंतर सकाळी 10.50 वाजता सुराज्य नगर, बार्शी रोड, बीड येथे आगमन.
सकाळी 10.50 वाजता प्रा. सुशिलाताई मोराळे यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट. नंतर सकाळी 11.15 वाजता खासबाग शासकीय रोप वाटीकेसमोर, शहिंशाह नगर, बीड येथे आगमन. सकाळी 11.15 राखीव .
सकाळी 11.45 वाजता जय हिंद सॉ-मिल सुभाष रोड योथे आगमन. सकाळी 11.45 वाजता राखीव.
दुपारनंतर 12.45 वाजता श्री. अमरसिंह पंडित माजी आमदार यांच्या निवासस्थानी, शिवछत्र, सुभाषरोड बीड येथे आगमन. दुपारी 12.45 वाजता राखीव.
दुपारी 1.55 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, बीड येथे आगमन. दुपारी 2.00 वाजता बीड जिल्ह्यातील विविध विकासकामे तथा योजनांची जिल्हास्तरीय आढावा बैठक.
सायं 4.00 वाजता जिल्हास्तरीय समितीची बैठक.
सायं. 5.00 वाजता पत्रकार परिषद.
सायं. 5.45 वाजता ऑलिव्ह व्हेज रेस्टॉरंट, नगर रोड, बीड येथे आगमन व उद्घाटन.
सायं. 6.10 वाजता लोकाशा भवन मोंढा रोड ,बीड येथे आगमन व दै. लोकाशा महोत्सव कार्यक्रम व 7.30 राखीव.
रात्री 8.15 वाजता मोटारीने छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण
******